It has finally been decided about the selection of Jamkhed Speaker ... This is the date 
अहिल्यानगर

जामखेड सभापती पदाच्या निवडीबाबत अखेर ठरलं...ही आहे तारीख

सकाळ वृत्तसेवा

 नगर ः गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेल्या जामखेड पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी करीत निवडीचा कार्यक्रम घोषित केला. महिलेसाठी सभापतीपद आरक्षणाची घोषणा आदेशात केल्यामुळे जामखेड तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या सभापती पदाची निवडप्रक्रिया 3 जुलैचा मुहूर्तावर पार पडणार आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सभापतीपदांच्या आगामी काळातील आरक्षणाची सोडत 12 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. सोडतीत जामखेड पंचायत समिती सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निश्‍चित झाले. मात्र, या पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने ग्रामविकास विभागाकडून तत्काळ मार्गदर्शन मागविण्याचे ठरविले. त्यानुसार जामखेड पंचायत समितीतील गणाची नावे व प्रवर्गासह नोंदवीत पुढील मार्गदर्शनाचा प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे रवाना करण्यात आला. 

पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर देखील जामखेड पंचायत समिती सभापती निवडीसंदर्भात कोणतेही मार्गदर्शन प्रशासनास प्राप्त झाले नव्हते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जामखेड सभापती आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शक निर्देश दिलेले ग्रामविकास खात्याचे पत्र जिल्हा प्रशासनात 27 डिसेंबर 2019 रोजी प्राप्त झाले. त्यावर अनुसूचित जमाती वगळून अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला अशा तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. ईश्वर चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. सोडतीत जामखेड सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले. मात्र, सभापती पदासाठी निर्धारित मुदतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यानंतर निवडप्रक्रिया घेण्यात आली. त्यावेळी सभापती पदासाठी राजश्री मोरे यांचा एकमेव अर्ज आला. मात्र, अर्ज माघारीच्या मुदतीत मोरे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे सभापती पद रिक्त राहिले. उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल करणाऱ्या मनीषा सुरवसेंची निवड झाली. तेव्हापासून तब्बल पाच महिने जामखेड पंचायत समितीचे सभापती पद रिक्त आहे. प्रभारी सूत्रे उपसभापती सुरवसेंकडे आहेत. 

आता जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशानुसार 3 जुलै रोजी पुन्हा एकवार जामखेड पंचायत समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया होत आहे. महिलेसाठी सभापती पदाचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे. या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंचायत समिती सभागृहात राजश्री मोरे व मनीषा सुरवसे या दोघीच महिला सदस्या आहेत. जामखेड पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्जत प्रातांधिकारी अर्चना नष्टे यांची नियुक्ती करण्यात आली असून जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 

अशी होणार निवडणूक प्रक्रिया 
अर्ज दाखलची मुदत व छाननी-सकाळी 11 ते दुपारी 1 
माघार व निवडणूक-दुपारी 3 
ठिकाण-जामखेड पंचायत समिती सभागृह  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

SCROLL FOR NEXT