It is our good fortune to get a straightforward Chief Minister like Thackeray!
It is our good fortune to get a straightforward Chief Minister like Thackeray! 
अहमदनगर

ठाकरेंसारखा सरळमार्गी मुख्यमंत्री मिळाला, हे आपले भाग्यच!

सुनील गर्जे

नेवासे : उद्धव ठाकरे यांच्यासारखे एक सत्शील व सरळमार्गी व्यक्तीमत्त्व असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, हे आपले भाग्य आहे, अशी स्तुतीसुमने ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.

नेवासे तालुक्यातील गिडेगाव येथे जिल्हा बँकेच्या संचालकपदी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील तसेच ज्ञानेश्वर व मुळा सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित पदाधिकारयांचा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. ज्ञानेश्वरचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, बबनराव भुसारी, काशिनाथ नवले, सभापती रावसाहेब कांगुणे, जिल्हा बँकेचे उमेदवार प्रशांत गायकवाड, दादासाहेब शेळके, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, भाऊसाहेब मोटे, मच्छिंद्र म्हस्के, यांच्यासह मुळा-ज्ञानेश्वर'चे सर्व संचालक उपस्थित होते.

राज्यमंत्री मिळेल वाटले होते पण...

ज्येष्ठ नेते गडाख म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर एखादे राज्यमंत्रीपद आपल्याला मिळेल असे वाटत असतानाच आपल्या संघटनात्मक ताकदीमुळे थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.

डॉ. नरेंद्र घुले म्हणाले, स्व. मारुतराव घुले पाटील व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे कार्य समोर ठेवून मुळा व ज्ञानेश्वरची निवडणूक बिनविरोध करुन त्यांची परंपरा समर्थपणे पुढे कायम ठेवली, ही जिल्ह्यासह राज्यात अभिनंदनीय बाब आहे. सर्वांना बरोबर घेऊनच यापुढेही काम करणार आहे. अत्यंत महत्वाचे तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मृद व जलसंधारण खाते मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून आपल्याकडे असल्याने पश्चिम वाहिनीतील नद्यांचे पाणी जर आपल्याला गोदावरी खोऱ्यात वळवता आले तर मुळा व भंडारदऱ्याचे आपल्या हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्याची गरज पडणार नाही. 

मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, "महाराष्ट्राला एक सरळ आणि साधा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रुपाने लाभल्याचे त्यांनी नमूद करुन त्यांनी पदग्रहण करताच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन टाकण्याचा पहिला निर्णय घेतला. यापूर्वी निवडणुकाजवळ आल्यावर कर्जमाफीच्या घोषणा केल्या गेल्या. मात्र, ही निवडणूक झाल्यावर करण्यात आलेली पहिली कर्जमाफी आहे.

या तालुक्यातील हजार-दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आपले प्रयत्न आहे. जिल्हा बँक ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अशी संस्था आहे. बँकेचा मागील पाच वर्षांचा कार्यकाल बघता त्यावर न बोललेलेच बरे. बँकेत अनेक गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे. जिल्हा बँकेला नवीन वळण देण्याची गरज आहे. जे चुकीचे आहे ते दुरुस्त करावे लागणार आहे. हे दुरुस्त करण्याचे काम यापूर्वीही स्व.घुले पाटील तसेच गडाख साहेबांनी केलेले आहे, ते यापुढील काळात मला व चंद्रशेखर घुले यांना करावे लागणार आहे. ते आम्ही प्रामाणिकपणे करणार आहे. त्यासाठी कोणाशी वाईटपणा घेण्याची वेळ आली तरी तो घेऊ. 

प्रास्ताविक व स्वागत सरपंच भगवान कर्डीले यांनी केले. यावेळी नानासाहेब रेपाळे, नानासाहेब फाटके, भैय्यासाहेब देशमुख, शिवाजी कोलते, बापूसाहेब शेटे, दादासाहेब गंडाळ, प्रभाकर कोलते, नारायण लोखंडे, शिवाजी शिंदे, असिफ पठाण आदी उपस्थित होते.

मंत्री गडाखांचा साधेपणा 
कार्यक्रमानंतर स्नेहभोजनासाठी आयोजकांनी स्वतंत्र व्यवस्था केलेली असतानाही मंत्री शंकरराव गडाख यांनी साधेपणा दाखवत उपस्थित कार्यकर्त्यांसोबत पंक्तीत बसूनच भोजनाचा आस्वाद घेतला. मंत्री गडाख यांचा साधेपणा उपस्थितांना चांगलाच भावल्याचे व त्यामुळे ते भारावून गेल्याचे दिसून आले. 
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT