Karjatkar number one in 12th exam 
अहिल्यानगर

व्वा रे पठ्ठे... बारावीत कर्जतकर नंबर वन... जिल्ह्याचा निकाल ९२ टक्के

दौलत झावरे

नगर ः बारावीच्या परीक्षेत नगर जिल्ह्याचा निकाल 91.97 टक्के लागला. नेहमीप्रमाणे मुलीच सरस ठरल्या. त्यांची पास होण्याची टक्केवारी 96.12 आहे. मुलांची टक्केवारी 88.93 राहिली. मागील वर्षी बारावीचा जिल्ह्याचा निकाल 85.15 टक्के लागला होता. यंदा त्यात 6 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. जिल्ह्यात कर्जत तालक्याने निकालात आघाडी घेतली आहे. तर सर्वात शेवटी श्रीरामपूर राहिले.

कोरोनामुळे यंदा दहावी-बारावीचे निकाल जाहीर होण्यास उशीर लागला. जिल्ह्यातील एकूण 63 हजार 811 पैकी 63 हजार 513 जणांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातून 58 हजार 412 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातही 32 हजार 631 मुले, तर 25 हजार 791 मुलींचा समावेश आहे. 
विज्ञान शाखेत 33 हजार 723 पैकी 33 हजार 774 जणांनी परीक्षा दिली. त्यातून 33 हजार 4 उत्तीर्ण (98 टक्के) झाले.

कला शाखेतील 19 हजार 614 पैकी 19 हजार 417 जणांनी परीक्षा दिली. त्यात 15 हजार 653 उत्तीर्ण (80.61) झाले. वाणिज्य शाखेत 9 हजार 368 पैकी 8 हजार 857 विद्यार्थी उत्तीर्ण (94.55) झाले. 
जिल्ह्यात पुनःपरीक्षार्थी 2967 पैकी 2961 जणांनी परीक्षा दिली. त्यात 810 उत्तीर्ण (27.36) झाले. 

कॉपीबहाद्दर नापास 
बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळून आलेले 104 विद्यार्थी नापास झाले. नापास विद्यार्थ्यांची सुनावणी लॉकडाउन काळात नगरला झाली. त्यात एकालाही क्‍लीन चीट मिळालेली नाही. 

शाखेनिहाय निकाल 
विज्ञान शाखा ः 
एकूण परीक्षार्थी ः 33674 
एकूण उत्तीर्ण ः 33004 
टक्केवारी ः 98.01 

कला शाखा 
एकूण परीक्षार्थी ः 19417 
एकूण उत्तीर्ण ः 15653 
टक्केवारी ः 80.61 

वाणिज्य शाखा 
एकूण परीक्षार्थी ः 9368 
एकूण उत्तीर्ण ः 8857 
टक्केवारी ः 94.55 

व्होकेशनल अभ्यासक्रम 
एकूण परीक्षार्थी ः 1054 
एकूण उत्तीर्ण ः 898 
टक्केवारी ः 85.20 

तालुकानिहाय निकाल 
अकोले ः 89.36 
जामखेड ः 94.52 
कर्जत ः 95.75 
कोपरगाव ः 89.38 
नगर ः 91.59 
नेवासे ः 89.98 
पारनेर ः 93.71 
पाथर्डी ः 94.22 
राहाता ः 92.52 
राहुरी ः 89.22 
संगमनेर ः 94.60 
शेवगाव ः 94.57 
श्रीगोंदे ः 90.34 
श्रीरामपूर ः 85.32 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT