In Kasarapipalgaon Gram Panchayat, Sarpanch Monali Rajale has won 
अहिल्यानगर

जाऊबाई जोरात: आमदार मोनिका राजळेंची जावेसाठी रणनीती; सासूबाई पराभूत!

राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : कासारपिपंळगाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊबाई सरंपच मोनाली राजळे यांनी बाजी मारली आहे. विरोधी अर्जुन राजळे यांच्या गटाला दारुन पराभव स्विकारावा लागला. राजळे गटाने ११ जागा जिकूंन पंचायतीची सत्ता कायम राखली आहे. मोनाली राजळे यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता, त्यांनी विश्वास मिळविला आहे.

कासारपिपंळगाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ पँनल हा सत्ताधारी होता. मोनाली राजळे सरपंच तर राहुल राजळे उपसरपंच होते. राहुल राजळे जिल्हा परिषद सदस्य झाले तेव्हा त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते पदही रिक्तच ठेवलेले होते. 

निवडणुकीत मोनाली राजळे यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली. विरोधी गटाकडून अर्जुन राजळे व त्यांच्या सहका-यांनी आव्हान सत्ताधारी गटासमोर उभे केले होते. मोनाली राजळे यांच्या नव्या नेतृत्वाची झळाली यामुळे दिसली आहे. राजळे घरातच सत्ता संघर्ष पेटला आहे. शिवशंकर राजळे व राहुल राजळे जिल्हा परीषदेत उभे असताना गावाने मात्र शिवशंकर राजळे यांच्या बाजुने त्यावेळी दिलेला कौल ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाला नाही. सत्ताधा-यांना विरोधी गटाने मात्र चांगलेच जेरीस आणले. राजळे कुटुंबातील लहान-थोर माणसाला प्रचारात सहभागी व्हावे लागले व लोकांच्यामध्ये जावे लागले अशी पहिलीच वेळ असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

जनतेला दिलेला कौल मान्य आहे. आम्ही लोकांच्या समोर गेलो. भूमिका सांगितली मात्र कारखान्यात पोट भरणारे अनेकजण गावात आहेत. हुकुमशाही पद्धतीने दबावाचे राजकारण केले गेले. लोकशाहीत पराभव झाला आहे. मात्र लोकांच्या मनातील खदखद व्यक्त करणा-यासाठी गावाला व्यासपीठ निर्माण झाले हे महत्वाचे आहे. 
- अर्जुन राजळे, अध्यक्ष आदिनाथ नागरी पतसंस्था, कासारपिपंळगाव,ता.पाथर्डी. 

जनेतेने आमच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. विकासाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढविली. लोकांच्या मनात काहीतरी भरु देणा-यांना जनतेने मतदानातून दाखवून दिले आहे. लोकशाहीत मतदार राजा असतो त्यांनी दिलेल्या दानाचे मोल करु. 
- मोनाली राजळे, सरपंच, कासारपिपंळगाव. ता.पाथर्डी. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT