Ahmednagar Crime kidnapping of a married woman for ransom at rahuri crime news
अहिल्यानगर

खंडणीसाठी विवाहितेचे अपहरण, केली ५ लाखांची मागणी

पुरुषोत्तम कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : तालुक्यातील एका विवाहितेचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करीत आरोपीने पाच लाखांची खंडणी मागितली. यापैकी तीन लाखांची वसुली केली. याप्रकरणी पीडितेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, एकाविरुद्ध अपहरण, विनयभंग, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हाउसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. लोखंडे याने राहुरी परिसरात गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी सव्वासात वाजता, घरी जात असलेल्या महिलेचे वाहन अडविले. बंदुकीचा धाक दाखवून तिचे अपहरण केले, तसेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. ही बाब कोणास सांगितल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची व कुटुंबासह तिला जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेस पाच लाखांची खंडणीही मागितली. तीन लाख रुपये पीडितेकडून घेतले.


सुटका करून घेतल्यानंतर पीडित महिलेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आज (शुक्रवारी) राहुरी पोलिस ठाण्यात तो वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

Crime: पत्नी निघून गेली; नराधम बापानं १४ वर्षीय लेकीला वासनेचं बळी केलं अन्...; २ महिन्यांनी जे घडलं त्यानं सारेच हादरले

Ranji Trophy: अजिंक्य रहाणे - ऋतुराज गायकवाडचा शतकी धमाका; मुंबई - महाराष्ट्र संघांना सावरलं

US Immigration Rule: अमेरिकेचा अजून एक मोठा धक्का! परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले, आता प्रवेशासाठी 'ही' गोष्ट आवश्यक

राज्य मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल ते मोठा नेता भ्रष्टाचारात अडकणार? काय सांगतं राजकीय भविष्य?

SCROLL FOR NEXT