Kiran Baird became a star storyteller 
अहिल्यानगर

नगरचे किरण बेरड ठरले स्टार कथालेखक, वर्ल्ड बुक अॉफ रेकॉर्डने घेतली नोंद

सकाळ वृत्तसेवा

नगर ः सध्या वेबसिरीजच्या माध्यमातून चित्रपट कथालेखक किरण बेरड मराठी इंडस्ट्रीत धुमाकूळ घालीत आहेत. विविध चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या वेबसिरिज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहेत. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक भागाला मिलियनच्या मिलियन व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. प्रेक्षकांसोबतच जागतिक पातळीवरून त्यांची दखल घेतली आहे. अशा प्रकारचा मान मिळवणारे ते नगरमधीलच नव्हे तर मराठीतील पहिले लेखक आहेत.

कोणतीही कथा किंवा इपिसोड करीत असताना त्यातून सामाजिक संदेश योग्य रितीने प्रेक्षकांपर्यंत कसा जाईल, याची ते नेहमी दक्षता घेतात. प्रत्येक वेळी सामाजिक संदेश दिल्याशिवाय त्यांचा कोणताही भाग पूर्ण होत नाही, हेच त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.

चांगलं काम करीत राहिले की कोणाचे ना कोणाचे लक्ष जातेच. तुमच्या ध्यानीमनी नसतानाही तुमच्या कामाची दखल घेतली जातेच. चित्रपट कथालेखक बेरड यांच्यासोबत तेच झाले.

सध्या गावरान मेवा ही वेबसेरीज संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरलेली ही एकमेव वेबसेरीज ठरली. किरण बेरड हे त्या वेबसेरीजचे लेखक आहेत.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग क्षतिग्रस्त झाले आहे. या आजारापेक्षा लोकांच्या मनात भीतीच जास्त आहे. गैरसमजाचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे आपल्या वेबसिरीजच्या माध्यमातून बेरड यांनी प्रबोधनाचे काम केले.

लॉकडाऊनमध्ये कोरोना व्हायरस काय आहे? आपण कशी काळजी घेतली पाहिजे? काय केलं पाहिजे? काय नाही केलं पाहिजे? यावर जनजागृती करणाऱ्या अनेक  स्क्रिप्ट लिहून त्यावर सादरीकरण करून यूट्यूब चॅनेलवर अपलोड केल्या. त्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले. त्यांची खूप चर्चा तर झालीच. परंतु लोकांनी ते कौतुक करीत शेअरही केले. 

किरण बेरड हे गेल्या सात वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. त्यांचे दोन मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड पब्लिशिंग लिमिटेड युनायटेड किंगडम यांनी त्यांच्या स्टार 2020 डिरेक्टरी एडिशनमध्ये त्यांची नोंद केली आहे.

सध्या त्यांची नवी कोरी उचापत्या ही ग्रामीण बाज असलेली बेवसिरीज येत आहे. त्यांच्या वेबसिरीजमुळे अनेक ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ मिळाले आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : पडळकरांचं हे वागणं योग्य नाही! शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना केला फोन, नेमकं काय म्हणाले?

Yasin Malik : दहशतवादी यासिन मलिकचा मोठा दावा! म्हणाला, 'हाफिज सईदला भेटल्यानंतर मनमोहन सिंग यांनी...'; वाजपेयी, सोनिया गांधींचंही घेतलं नाव

Nitish Kumar: बेरोजगार भत्ता आता पदवीधरांनाही लागू; मुख्यमंत्री नीतिशकुमार यांची घोषणा, योजनेची व्याप्ती वाढविली

Purandar International Airport: तब्बल २७०० एकर जागेची संमतिपत्रे, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ; जिल्हाधिकाऱ्यांकडून भूसंपादनाचा ‘पुणे पॅटर्न’

Nagar-Pathardi Road Accident:'नगर-पाथर्डी रस्त्यावरील अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू'; कामानिमित्त जाताना काळाचा घाला; बाराबाभळी शिवारातील घटना

SCROLL FOR NEXT