A leopard has been caught at Deolali Pravara 
अहिल्यानगर

देवळाली प्रवरात बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : देवळाली प्रवरा येथे मुसमाडेवस्तीवर वनखात्याने मागील आठवड्यात पिंजरा लावला होता. त्यात रविवारी पहाटे चार वाजता नर जातीचा दोन वर्षांचा बिबट्या अडकला. त्यास वन विभागाच्या डिग्रस येथील रोपवाटिकेत हलविण्यात आले आहे.

ग्रामस्तरावरील 'दक्षता समित्या' कागदावरच
 
देवळाली प्रवरा भागात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. त्याने परिसरातील शेळ्या व कुत्री ठार केली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण होते. नागरिकांच्या मागणीवरून वन विभागाने मागील आठवड्यात डॉ. तनपुरे साखर कारखान्यासमोरून देवळाली प्रवराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाबासाहेब मुसमाडे (रा. देवळाली प्रवरा) यांच्या शेतात पिंजरा लावला होता.

शनिवारी रात्री दहा वाजता अक्षय मुसमाडे यांनी बिबट्याची डरकाळी ऐकली होती. आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाच्या पथकाने या बिबट्यास डिग्रस येथील रोपवाटिकेत हलविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT