Leopards have been found again in the Chandbibi Mahal area 
अहिल्यानगर

चांदबीबी महाल परिसरात पुन्हा आढळला बिबट्या; गावांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरापासून जवळच पाथर्डी रस्त्यावर सुमारे दहा किमीवर असलेल्या चांदबीबी महाल परिसरात तीन महिन्यांनंतर पुन्हा बिबट्या आढळून आला आहे. यामुळे या परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नगर-पाथर्डी रस्त्यावर गर्भगिरी डोंगररांगांमध्ये असलेल्या चांदबीबी महालावर शहरातील अनेक नागरिक सकाळी फिरायला जातात. सुनील माळवदे मंगळवारी (ता. 30) सकाळी कारमधून महालाकडे जात असताना त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी ही माहिती व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे सदस्य आणि निसर्गमित्र मंदार साबळे यांना दिली. साबळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी वनकर्मचाऱ्यांच्या पथकासह महाल परिसरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना बिबट्याचे ठसे आढळून आले. 

चॉंदबीबी महाल परिसरात तीन महिन्यांपूर्वी बिबट्या आढळला होता. बिबट्याने पाथर्डी, आष्टी, करमाळा या भागांत काही लहान मुले आणि शेतात काम करणाऱ्यांना ठार केले होते. जिल्ह्याचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी, 'गर्भगिरी डोंगररांगा या बिबट्याला राहण्यासाठी अनुकूल असल्यामुळे या भागात बिबटे सातत्याने येत आहेत. अशा स्थितीमध्ये कोणीही एकट्याने या भागात जाऊ नये. त्यातून हल्ला होण्याचा जास्त धोका असतो. या भागात जाताना चार-पाच व्यक्‍तींच्या समूहाने जावे,' असा सावधतेचा इशारा दिला आहे. सध्या झाडांची पानगळ सुरू आहे. या पानांचा रंग पिवळसर आणि करडा असतो. बिबट्याच्या रंगाशी तो मिळता-जुळता असल्याने बिबट्या लपलेला दिसून येत नाही. त्यामुळे सावधनता बाळगण्याचे आवाहन निसर्गमित्र मंदार साबळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT