He left his mentally ill girlfriend in the hospital 
अहिल्यानगर

Love stoy ः मराठवाड्यातील प्रेयसीला घेऊन पुण्याला पळाला, ती मनोरूग्ण होताच नगरला सोडून पळाला

सूर्यकांत वरकड

नगर : मराठवाड्यातील छोट्याशा गावातील "ती'. लहानपणापासून धाडसी, कष्टाळू. कोणतेही काम असू द्या, नेहमीच आघाडीवर. थेट सरपंचपदाची निवडणूक लढली. मात्र, नंतर तिच्या जीवनात "तो' आला नि आयुष्याची फरफट सुरू झाली. अर्ध्यावरती डाव मोडून "तो' परागंदा झाला. "ती' मनोरुग्ण झाली. नगरच्या अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने तिच्या जगण्याला पुन्हा उभारी दिली. 

माधुरी (नाव बदलले) हिच्या आयुष्याची ही कहाणी. तिचं मूळ गाव मराठवाड्यातील. अगदी लहाणपणापासून ती धाडसी होती. तिच्या या धाडसी वृत्तीचे नातेवाईकांना मोठे अप्रूप वाटत असे. अगदी तरुण वयातच तिने ग्रामपंचायत निवडणूक लढविली. काही कामानिमित्त गावाजवळील नातेवाईकांच्या घरी गेली.

काही दिवस तिथंच राहिली आणि नकळत शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिला पळवून नेले. तो पुण्यात कंपनीत काम करू लागला. आमदनी जास्त नसल्याने तो मित्रांसोबत राहत होता. तिच्यापुढेही पर्याय नव्हता. तिही त्यांच्यासोबतच राहू लागली; पण हे तिला रुचत नव्हते. तिच्या मनाला ठेच पोचली. त्यातून मानसिक आजार वाढत गेला. 

आपली प्रेयसी मनोरुग्ण झाल्याचे पाहून त्याने तिच्यावर पुण्यात उपचार करण्याऐवजी नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणले. दोन दिवस उपचार केल्यावर एके दिवशी अचानक तो गायब झाला. ही बाब लक्षात येताच, रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरणगाव (ता. नगर) येथील मानवसेवा मदत व पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधला. पोलिसांनी मनोरुग्ण माधुरीला मानवसेवा प्रकल्पात दाखल केले. 

मानवसेवा प्रकल्प संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ व कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. प्रकृती सुधारल्यावर तिने आयुष्याची फरफट गुंजाळ यांच्यासमोर मांडली. गुंजाळ यांनी मराठवाड्यातील एका तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तिच्या कुटुंबाचा शोध घेतला.

सामाजिक कार्यकर्त्या अनिता मदने यांना सोबत घेऊन माधुरीला थेट तिच्या गावी कुटुंबासमोर हजर केले. अचानक तिला पाहुन कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या आयुष्यात अखेर स्थैर्य आले. 

धक्‍क्‍याने आईचा मृत्यू 
माधुरी गावातून गायब झाल्यावर तिचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली होती. त्या धक्‍क्‍याने तिच्या आईचा मृत्यू झाला. माधुरी गावात पोचताच, गावकरी गोळा झाले. कुतुहलाने पाहू लागले. काहींनी तिची आस्थेवाईपणे चौकशी केली. 


जिल्हा रुग्णालय व पोलिसांमार्फत ती आमच्या संस्थेत आली. उपचारानंतर स्वच्छता, स्वयंपाकाचे काम करू लागली. नंतर तिच्या कुटुंबाचा शोध घेतला. कुटुंबाबरोबर चर्चा करून त्यांचे समपुदेश केले. तिला तिच्या माणसांत पोचविल्याचा आनंद वाटतो. 
- दिलीप गुंजाळ, संस्थापक, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ, अरणगाव , अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT