Kirit Somaiya Sakal
अहिल्यानगर

Love Jihad : ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदे करा - किरीट सोमय्या

राज्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणात राबवला जातोय का, अशी शंका येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - राज्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणात राबवला जातोय का, अशी शंका येत आहे. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी. कायद्यात सुधारणा करून कठोर शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (ता. ७) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. कर्जतमधील अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

सोमय्या म्हणाले, की कर्जत तालुक्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आल्याचा आरोप होत आहे. एका अल्पवयीन मुलीला पळविण्यात आले आहे. तिचा अद्याप शोध लागलेला नाही. मुलीचा शोध लावून तिला कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावे. जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ‘लव्ह जिहाद’ची एक डझनापेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. यातील पीडित दहा परिवारांची भेट घेतली असून, जिल्हाधिकारी यांच्याकडे योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणात विशिष्ट समाजाची मुले हे दलित, गरीब कुटुंबांतील १८ वर्षांखालील मुलींना पळवितात आणि त्यांच्याशी विवाह केला जातो. यामध्ये त्या मुलींवर अन्याय, अत्याचार होत असल्याचे समोर येत आहे.

याबाबत आपण सरकारकडे ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांना आळा बसावा म्हणून कडक कायदा व्हावा, अशी मागणी करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नैतिकतेला तडा! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक, जनतेचा संताप उसळला...

Eknath Shinde : लाडक्‍या बहिणीच बदलतील कारभारी; शिवसेना उमेदवारांसाठी नाना पेठ, कात्रजमध्ये सभा

UPSC Interview Tips: UPSC मुलाखतीत काय विचारले जाते? जाणून घ्या बोर्डचे प्रश्न आणि सोपे टिप्स

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT