A memorandum has been sent to the energy minister to streamline power supply at Sangamner 
अहिल्यानगर

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ऊर्जामंत्र्यांना निवेदन

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) :  तालुक्‍याच्या पूर्व भागातील पिंप्री- लौकी- अजमपूरमधील कृषी पंपांचा रात्री होणारा वीजपुरवठा बंद करून तो दिवसा सुरू करण्याच्या मागणीसाठी नेते भारत गिते यांनी ऊर्जामंत्र्यांना निवेदन पाठविले.

हे ही वाचा : पुणतांबे ग्रामपंचायतीचा साठवण तलाव कोरडा; पर्यायी योजनेतून तहान भागवण्याची तयारी
 
त्यात म्हटले आहे,  आठ ते नऊ वर्षांपासून या गावांतील कृषी पंपांसाठी तीन आठवड्यांतील सलग दोन आठवडे रात्री वीजपुरवठा होतो. या भागात काही वर्षांपासून बिबट्यांची संख्या वाढल्याने, त्यांच्या दहशतीखाली शेतकऱ्यांना शेताला पाणी द्यावे लागते. भर दिवसाही बिबट्यांचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. अशा स्थितीत रात्री पाणी भरण्यासाठी जीव मुठीत धरूनच जावे लागते.

याशिवाय कृषी पंपांचा खळी उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने रोहित्रे व वीजपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन वर्षे दुष्काळाचा सामना केल्यानंतर या वर्षी हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. या प्रश्‍नाबाबत राज्याचे ऊर्जामंत्री व शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिष्टमंडळासह भेटणार आहोत.

संपादन - सुस्मिता वडतिले  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची आज 'देवगिरी'वर बैठक

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

Ashok Kharat Case : खरातचे कारनामे संपेनात ! आधी पीडित महिलांची अब्रू लुटायचा अन् मग श्रीमंत पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवायला लावायचा...

SCROLL FOR NEXT