MLA Radhakrishna Vikhe said restrictions on internet banking should be relaxed 
अहिल्यानगर

इंटरनेट बॅंकिंगसाठी निर्बंध शिथील करावेत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हार (अहमदनगर) : राष्ट्रीयकृत व खासगी बॅंकांबरोबर स्पर्धा करताना सहकारी व नागरी बॅंकांना कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर इंटरनेट बॅंकिंग सुविधा मिळण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने नागरी सहकारी बॅंकांवर घातलेले निर्बंध व अटी शिथील कराव्यात, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली. खासदार सुजय विखे यांनी यासाठी पंतप्रधानांकडे शिष्टमंडळामार्फत प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. 

प्रवरा सहकारी बॅंकेची 46वी वार्षिक सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. त्यावेळी विखे पाटील बोलत होते. बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, बॅंकेचे उपाध्यक्ष अशोक आसावा, नंदकिशोर राठी, विश्वास कडू, बापूसाहेब आहेर, कैलास तांबे, ऍड. उदय खर्डे, गीताराम तांबे, गीता थेटे, डॉ. सौरभ बालोटे, एन. एस. डोईफोडे, डी. जी. उदावंत, ए. एन. माघाडे आदी उपस्थित होते. 

विखे पाटील म्हणाले, प्रवरा बॅंकेने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, बॅंकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चालला आहे. बॅंकेने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला. एक हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला. लवकरच एक हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करावा. चांगले कर्जदार शोधावेत, थकीत कर्जवसुलीसाठी प्रयत्न करावेत.'
 
अण्णासाहेब म्हस्के यांनी मनोगत व्यक्‍त केले. सर्व ठराव मंजूर झाले. बाळासाहेब भवर यांनी अहवालवाचन व डॉ. सौरभ बालोटे यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. सूत्रसंचालन बाळासाहेब सानप यांनी केले. अशोक आसावा यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT