अहमदनगर

सदाभाऊ खोत अण्णांच्या भेटीला, सरकारलाच कोरोना झाल्याची टीका

एकनाथ भालेकर

मोर्चे, उपोषणे कोणी करू नका असे सांगणा-या राज्य सरकारलाच ख-या अर्थाने कोरोना झालाय अशी टिका माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : सरकारमध्ये नसताना शेतक-यांच्या बांधावर जाऊन नैसर्गिक नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपये तर बागायती शेतक-यांना हेक्टरी १ लाख रूपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी करणारे सध्याचे मुख्यमंत्री हे कोरोनाच्या नावाखाली घरात बसून कारभार करीत आहेत. कोरोना संकटाने अडचणीत असलेल्या शेतक-यांना पीक कर्ज, खते, बि - बियाणे मिळत नाहीत. मोर्चे, उपोषणे कोणी करू नका असे सांगणा-या राज्य सरकारलाच ख-या अर्थाने कोरोना झालाय अशी टिका माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. (MLA sadabhau khot met senior social activist anna hazare on sunday and discussed various issues of farmers)

शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी खोत यांनी आज रविवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता सुमारे अर्धातास चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खोत बोलत होते.

खोत म्हणाले, हजारे यांचे सामाजिक चळवळीतील योगदान खूप मोठे आहे. दुरदृष्टी ठेऊन सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांबरोबर ते लढतात. अण्णांच्या चळवळीतून अन्यायकारक व्यवस्थेविरोधात लढण्यासाठीचे तरूणांना बळ मिळते. पाणलोट क्षेत्रविकासाचे त्यांचे काम पाहून मी २१ वर्षांपासूनचे माझे गाव टॅंकरमूक्त केले. सहकार चळवळ टिकली पाहिजे. सहकारी कारखाने व बॅंका टिकल्या पाहिजेत. या साठी ५० सहकारी कारखाने खाजगीकरणाविरोधात सर्वात प्रथम अण्णांनी लढा उभारला.

हजारे यांनी राज्य सरकारकडे शेतक-यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला तर शेतक-यांना निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास वाटतो, असे माजी मंत्री खोत म्हणाले. पुढील चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र व विदर्भाचा दौरा करून शेतक-यांच्या प्रश्नांवर जनजागृती करणार असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या काळात शेतक-यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. शेतक-यांच्या विविध अडिअडचणी माझ्या कानावर येत आहेत. बि - बियाणांचे घोटाळे, खते मिळत नाहीत, पीक कर्जाबाबत तसेच शेतक-यांच्या मालाची विक्री व भावाबाबत समस्या आहेत. अशा परिस्थितीत राज्य व केंद्र शासनाने मोठ्या स्तरावर मदत करून शेतक-यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे. (MLA sadabhau khot met senior social activist anna hazare on sunday and discussed various issues of farmers)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT