MLA Sangram Jagtap has demanded the railway administration to start intercity railway service 
अहिल्यानगर

इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करा ; संग्राम जगताप यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शिर्डी- नगर- पुणे- मुंबई रेल्वे सेवेमुळे शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांची मोठी सोय होत होती. रोज दीड ते दोन हजार प्रवासी या रेल्वेने प्रवास करीत होते. ही सेवा कोरोना संकटामुळे बंद आहे. ती पुन्हा सुरू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी रेल्वे स्थानक प्रबंधक नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की नगर- पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे. खासगी वाहने, बसद्वारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदी हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. परिणामी, रस्तेवाहतुकीवर ताण येतो. रहदारी खोळंबणे, अपघात आदी समस्या निर्माण होऊन वेळ, इंधन व पैशांचा अपव्यय होतो. हे सर्व टाळण्यासाठी नगर- पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. 

या वेळी माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, ए.एन.शर्मा, रामेश्वर मीना, आर.के.बावडे, महेश सुपेकर, खलिल मन्यार, नंदू लांडगे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District Bank Recruitment: पुणे जिल्हा बँक क्लार्क भरतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; गुणपत्रक न जाहीर केल्याने उमेदवार संतप्त

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६ ची नामांकनं जाहीर! 'दशावतार', 'गोंधळ' आणि 'आता थांबायचा नाय!' चा डंका; पाहा सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रींची यादी

Fulambri Governance : लोकांची अडवणूक थांबवा, कामे वेळेत पूर्ण करा : आमदार सुहास शिरसाठ यांचे फुलंब्रीतील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Farmer Accident Insurance: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघात विमायोजना लवकरच सुरू : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Mahabaleshwar Kelghar Ghat : केळघर घाटातील काळाकडा येथे दरड हटली, जेसीबी बाहेर; भूस्खलनाचा धोका कायम, रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT