leopard Google
अहिल्यानगर

आई ती आईच! लेकरासाठी मातेचे बिबट्याशी दोन हात

सकाळ डिजिटल टीम

संगमनेर (जि. नगर) : शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या आईच्या दिशेने जाणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकल्यावर, बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (leopard attack) अचानक हल्ला केला. आईने बिबट्यावर थेट प्रतिहल्ला करून मुलाला त्याच्या तावडीतून सोडविले. ही थरारक घटना धांदरफळ खुर्द (ता. संगमनेर) शिवारातील माणकेश्वर मळा परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

माणकेश्वर परिसरातील शेतवस्तीवर राहणाऱ्या सागर खताळ यांच्या पत्नी कविता जनावरांना चारा आणण्यासाठी घराजवळच्या शेतात गेल्या होत्या. त्या घास कापत असताना, घरातून निघालेला मुलगा शिवराज (वय पाच) त्यांच्याकडे जात होता. त्याचे आजोबा बबनराव शेळ्यांच्या गोठ्याच्या स्वच्छतेचे काम करीत होते. शिवराज शेतात पोचत असतानाच, बाजूच्या मक्याच्या शेतातून त्याच्यावर अचानक बिबट्याने झडप घालून त्याची मान जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. हे दृश्‍य पाहून त्याच्या आईने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रुद्रावतार धारण करीत, हाती सापडलेल्या काठीने बिबट्यावर प्रतिहल्ला केला. या मायलेकांच्या ओरडण्यामुळे परिसरातील लोकही धावल्याने बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात शिवराजची मान, डोके, पाठ, तोंडावर बिबट्याचे दात व नखे लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती समजताच संगमनेर भाग-एकचे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून, पिंजरा लावण्याची व्यवस्था केली आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कविता यांच्या प्रसंगावधानाबरोबरच त्यांनी दाखविलेल्या धैर्याचे कौतुक होत आहे.

संगमनेरमधील प्रवरा पट्ट्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. शेतवस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांनी अधिक सजग व सावध राहणे आवश्यक आहे. सायंकाळच्या वेळी लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच अंगणात खेळणाऱ्या मुलांवरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

- नीलेश आखाडे, वनक्षेत्रपाल, संगमनेर भाग-एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT