मृतदेह 
अहिल्यानगर

दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

सकाळ डिजिटल टीम

राहुरी (जि. अदमगनगर) : शहरात काल (मंगळवारी) दुपारी गणपती घाटाजवळ मुळा नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांचे मृतदेह आज (बुधवारी) पाण्यावर तरंगताना आढळले. मृत सख्खे भाऊ होते. मृत मुलांना पाहून आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज चिरून गेला.


अमर चंद्रकांत पगारे (वय १५) व सुमित चंद्रकांत पगारे (वय १२, रा. लोहार गल्ली, राहुरी) अशी मृतांची नावे आहेत. काल दुपारी एक वाजता लोहार गल्लीतील पाच मुले मुळा नदी पात्रात पोहोण्यासाठी गेले होते. पैकी, अमर व सुमित पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. इतर तिघेजण थोडक्यात बचावले. काल दुपारपासून नदीपात्रात शोधकार्य सुरु होते. परंतु, रात्री अंधार होईपर्यंत मुलांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे, शोधकार्य थांबविले होते. आज (बुधवारी) सकाळी सव्वासात वाजता गणपती घाट परिसरात बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर अमरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. बाळासाहेब पवार, चंद्रकांत माळी, भागवत आहेर, गोविंद पवार, राजेंद्र नारद, विशाल राऊत या तरूणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

सकाळी अकरा वाजता सुमितचा मृतदेह तनपुरेवाडी रोड, व्यंकटेश नर्सरी परिसरात गाडेकर यांच्या शेती जमिनीलगत मुळा नदीपात्रातील पाण्यावर तरंगताना आढळला. देवा कर्डक, सुरेश वाघ, फुलसौंदर, आलम शेख व स्थानिक तरुणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. राहुरी ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेह ठेवण्यात आले. यावेळी मृत मुलांची आई, बहिण व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. तेंव्हा उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

SCROLL FOR NEXT