MP Dr. Sujay Vikhepatil has said that the water problem of the beneficiary farmers will be solved 
अहिल्यानगर

श्रीगोंदा पॅटर्न पारनेर तालुक्यात राबविणार; खासदार डाॅ. विखे पाटलांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : आपला लढा आपणचं उभारला पाहिले. शेतक-यांची पाणी वाटप संस्था गरजेची आहे. पाटबंधारे विभागाकडे कर्मचारी वर्ग कमी असेल तर माझी यंत्रणा दिली जाईल. जसे श्रीगोंदामध्ये केले तोच पॅटर्न आपण पारनेरमध्ये करू व शेतक-यांचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिले.

अळकुटी (ता.पारनेर) येथे पिंपळगाव जोगे पाणी प्रश्नावर अधिकारी व लाभार्थी शेतकरी यांची विखे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  त्यावेळी ते बोलत होते.
डाॅ.विखे म्हणाले, टेलपासून टेकपर्यंत उच्च दाबाने पाणी आणण्याचे काम माझे आहे. मला बाकी विषयावर बोलण्यात वेळ घालायचा नाही. लाभार्थी शेतकरी वंचित राहता कामा नये हिच भूमिका आपली आहे. समाजाचे प्रश्न सोडले म्हणजे मी समाधानी आहे असे वाटले पाहिजे. मी जनतेचा टाळ्या वाजून घेणारा खासदार मुळीच नाही. यांची जाणिव तुम्हाला भविष्यात येईल. यासंदर्भात गुरूवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल.

यावेळी सभापती गणेश शेळके विश्वनाथ कोरडे, डाॅ.भास्कर शिरोळे, राहुल शिंदे, दिनेश बाबर, सचिन वराळ, शरद घोलप, डाॅ.कोमल भंडारी उपस्थित होते.

त्यागाशिवाय राजकारण टिकणे शक्य नाही 

मला पंधरा हजाराने तालुक्यात मताधिक्य आहे. त्यामुळे मला श्रेयवादात पडण्यापेक्षा लाभार्थी शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका आहे. तालुक्यात आल्यावर माझ्या गाडीत महाविकास आघाडी असते. त्यामुळे त्यागाशिवाय राजकारण टिकणे शक्य नाही.
- डाॅ.सुजय विखे पाटील, खासदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT