nagar sakal
अहिल्यानगर

सभेपूर्वीच एकमेकांवर चिखलफेक

गैरव्यवहारातील पैसे अगोदर बँकेत भरा : ठुबे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दीनिमित्त दिलेल्या घड्याळांमधील गैरव्यवहार, कर्मचारी मेहनताना गैरव्यवहार, पाथर्डी शाखा गैरव्यवहार, असे गैरव्यवहारांचे महामेरू शिक्षक बँकेचे सत्ताधारी संचालक मंडळ आहे. या गैरव्यवहारातील पैसे अगोदर बँकेत भरा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिला आहे. (Ahamadnagar News)

ठुबे यांनी ई-मेलद्वारे बँकेच्या कारभारावर टीका केली आहे. यामध्ये म्हटले आहे, की मागील वर्षीच्या सभेमध्ये राज्य कार्यक्षेत्र करण्याचा तुघलकी निर्णय विद्यमान संचालक मंडळाने आणला होता. त्या निर्णयाला सर्व सभासदांनी जोरदार विरोध केल्यामुळे त्यावेळी सत्ताधाऱ्यांना काढता पाय घेऊन निर्णय मागे घ्यावा लागला होता. या वेळीदेखील कर्जनिवारण निधी व कुटुंब आधार योजनेसाठी सभासदांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पोटनियम दुरुस्तीनुसार प्रत्येक सभासदाच्या मयत कर्जनिवारण ठेवीमधून सात हजार रुपये कपात करून घेतले जाणार आहेत. तसेच, कुटुंब आधार योजनेसाठी दीडशे रुपयांवरून पाचशे रुपये कपात केली जाणार आहे.

घड्याळ गैरव्यवहार, कर्मचारी मेहनताना गैरव्यवहार, पाथर्डी शाखा गैररव्यवहार झाले आहेत. संचालक मंडळाला भविष्यामध्ये धडा शिकविण्याचे काम अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळ करेल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, मृत सभासदांची संपूर्ण कायम ठेव रक्कम, शेअर्स रक्कम संबंधित कुटुंबीयांना तत्काळ द्यावी, अशी मागणी राम निकम, दत्ता गमे, रवींद्र कांबळे, सुभाष गरुड, मीनाक्षी तांबे-भालेराव, आर. पी. राहाणे, संजय शेळके आदींनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

अहमदनगर शिक्षक बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कारभार हा अत्यंत सभासदांभिमुख व समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा बुलंद करणारा आहे. भ्रष्टाचाराचा कोणताही मुद्दा या संचालक मंडळाने हाताळलेला नाही. एकदा विरोधकांनी इतिहासामध्ये जाऊन आपल्या काळातील अहवाल तपासून आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी दिला. गुरुकुल मंडळाचे नेते संजय कळमकर यांनी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाबद्दल अनेक आक्षेप घेतले होते. त्याला साळवे यांनी उत्तर दिले आहे.

साळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की या पाच वर्षात बोनस, मेहनताना, रजेचा पगार या सर्व गोष्टींना फाटा दिला आहे, असे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे यांनी संबंधित पत्रकात म्हटले आहे. आपल्या काळातील नफ्याची टक्केवारी किती होती, हेही आपण तपासून पहावे, असा खोचक सल्लाही गुरुमाऊली मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी दिला आहे.

‘गुरुकुल’चे परिवर्तन का?

विद्यमान संचालक मंडळाने पहिल्या वर्षी विकास मंडळ उभारणीसाठी निधी देण्याबाबत ठराव केला असता ‘गुरुकुल’चे नेत्यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते. आता मात्र इमारतीसाठी विकास मंडळाला बॅंकेने मदत करावी, असे म्हणत आहेत. त्यांच्यामध्ये असे अचानक परिवर्तन का झाले? असा प्रश्‍न साळवे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT