Municipal employees do not get the benefit of contribution pension scheme properly 
अहिल्यानगर

महापालिकेतील कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजनेचा लाभ योग्य प्रकारे मिळत नाही. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून अंशदान पेन्शन योजनेच्या नावाखाली पैसे कपात होतात. मात्र, या योजनेत महापालिका त्यांचा वाटा टाकण्यास टाळाटाळ करते. केंद्रांच्या राष्ट्रीय निवृत्ती योजनेचाही लाभ महापालिका कर्मचाऱ्यांना मिळत नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी महापालिका उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन चर्चा केली.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
निवेदनात म्हटले आहे, की 1 नोव्हेंबर 2005 पासून महापालिकेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाचे वेतन व निवृत्तीवेतनाचा आदेश लागू केलेला नाही. राज्य शासनाची अंशदान निवृत्तीवेतन योजना ही 27 ऑगस्ट 2014 पासून केंद्रांच्या राष्ट्रीय निवृत्ती योजनेत समाविष्ट करण्यात आली. या दोन्ही योजना नगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात. तसेच अंशदान पेन्शन योजनेतील महापालिकेच्या वाट्याचे थकीत दोन कोटी रुपये महापालिकेने भरावेत, महापालिकेत सुमारे 400 कर्मचारी अंशदान पेन्शन योजनेत बसतात, असे निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनावर अमित मिसाळ, जी. के. हरबा, आर. आर. खाबिया, डी. के. दुग्गल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन : सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT