Muslim activists also liked Gadakh's Shiv Sena entry, Jai Maharashtra Karit Kurnisat 
अहिल्यानगर

मुस्लिम समाजालाही भावला गडाखांचा शिवसेना प्रवेश, जय महाराष्ट्र करीत कुर्निसात

सुनील गर्जे

नेवासे :  शिवसेना प्रवेशानंतर  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे   आज नेवासे शहरात आगमन होताच त्यांचे मुस्लिम समाजाच्यावतीने जोरदार स्वागत केले. एकंदर मुस्लिम समाजालाही गडाखांचा शिवसेना प्रवेश भावला. तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडूनही मंत्री गडाखांचे सत्कार केला. 

नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेशानंतर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या. मात्र शनिवार (ता. २९) रोजी प्रथमच त्यांचे नेवासे शहरातील त्यांच्या संपर्क कार्यालयात आगमन झाले.  
मंत्री शंकरराव गडाख यांचे आगमन होताच त्यांचा  शिवसेना प्रवेशबद्दल  मुस्लिम समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते गफूर बागवान, युवानेते असिफ पठाण, अब्दुल्ला बागवान  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक अॅड. काकासाहेब गायके,  बाळासाहेब कोकणे, सुलेमान मणियार,  नारायण लोखंडे, पंकज जेधे  उपस्थित होते. 

यावेळी मंत्री गडाखांनी उपस्थित प्रत्येक कार्येकर्त्यांशी संवाद साधून कोरोना महामारीच्या विरोधीतील लढ्यात सर्वांनी सरकारला सहकार्य करण्यासाठी नियमांचे पालन करून स्वतः बरोबरच परिवार व समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी नबाब बागवान, महेश कोकणे, अब्बास बागवान, हरून बागवान, समीर बागवान, युसुफ बागवान, फरदिन पठाण उपस्थित होते.  

गफूरभाईंचा 'जय महाराष्ट्र'
मंत्री गडाखांचा शिवसेना प्रवेश झाल्यानंतर संपूर्ण नेवासे तालुका 'जय महाराष्ट्र' मय झाला. तेव्हापासून गडाखांचा कार्येकर्ता असो की, चाहता नाहीतर विरोधक हे सर्व एकमेकांच्या भेटीप्रसंगी  'जय महाराष्ट्र'च म्हणणार. त्याचा प्रत्यय मंत्री गडाख यांना आज आला. मुस्लिम ज्येष्ठ नेते गफूर बागवान हे कार्यालयात येताच मंत्री गडाखांसह उपस्थितांना 'जय महाराष्ट्र' म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

गडाख हेच आमचा पक्ष : असिफ पठाण 

"मंत्री शंकरराव गडाख हेच आमचा पक्ष आणि संघटना आहे. आम्ही सर्व मुस्लिम समाज एकजुटीने त्यांच्याच पाठीशी कायम आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाचे आम्हाला स्वागत करतो. नेवासे तालुक्याच्या विकासासाठी ती गरजच होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाआघाडी सरकारचे काम कौतुकास्पद असल्याचे मुस्लिम युवा नेते असिफ पठाण हे म्हणाले. 
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT