CRIME 
अहिल्यानगर

गावाकडे शेतजमीन आहे का, असेल जाऊन तपासा; कर्जतमध्ये घडलाय भलताच प्रकार

सकाळ वृत्तसेवा

नगर ः एकाचा प्लॉट दुसऱ्याला विकण्याच्या घटना शहरी भागात घडत असतात. मात्र, कर्जत तालुक्यात जमीनच परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुम्ही जर शहरात रहात आणि गावाकडे जमीन असेल तर तुमच्याबाबतही असे घडू शकते. त्यामुळे कधीही सावध राहिलेलं बरं. अधूनमधून गावी जाऊन कागदपत्र तपासली पाहिजेत तसे झाले नाहीतर तुमची वडिलोपार्जित इस्टेट गेलीच म्हणून समजा.

मृत व्यक्‍तीच्या जागी तोतया उभा करून, कर्जत तालुक्‍यातील गुरव पिंप्री येथील जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आज एकास जेरबंद केले.

पुरुषोत्तम बापूराव कुरुमकर (वय 40, रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदे) असे त्याचे नाव आहे. कर्जत तालुक्‍यातील गुरव पिंप्री येथील 22 एकर जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला आहे.

असे असताना बनावट खरेदीखत तयार करून आरोपी पुरुषोत्तम कुरुमकर, निंभोरे (रा. घोटवी, ता. श्रीगोंदे) व त्यांच्या साथीदारांनी मिळून ही जमीन एकनाथ बाळासाहेब बांदल (रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) व त्यांच्या साथीदारांना विकली.

हा प्रकार समोर आल्यावर कर्जत पोलिस ठाण्यात कुरुमकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. आरोपी कुरुमकर आज नगर परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शहरातील लाल टाकी परिसरातून त्यास अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Survey 2025-26 : भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? महागाई वाढणार? जाणून आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

Viral Video: प्रसिद्धीसाठी तरुणाने चालत्या लोकलमध्ये लटकून केला जीवघेणा स्टंट, व्हायरल व्हिडिओ पाहाच

Ajit Pawar : पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेसाठी अजित दादानी दिलेला शब्द खरा केला

Viral : तुमच्या बँकेच्या कागदपत्रात वाटले जातायत रस्त्यावरचे खाद्यपदार्थ; व्हायरल फोटोमुळे पसरली 'डेटा प्रायव्हसी'ची भीती, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : वाघोलीत मद्यधुंद स्कूल बस चालकाची चार दुचाकी व कारला धडक

SCROLL FOR NEXT