rohit pawar esakal
अहिल्यानगर

'भूसंपादनात कोणावरही अन्याय होणार नाही' - आमदार रोहित पवार

सकाळ डिजिटल टीम

कर्जत (जि.नगर) : तालुक्यातून जाणाऱ्या नगर-करमाळा राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार रोहित पवार (mla rohit pawar) धावले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांसमवेत थेट गावागावांत जाऊन, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेत सर्वमान्य तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आमदार पवार यांनी मांदळी, थेरगाव, नागमठाण, घुमरी, कोकणगाव, मिरजगाव, बाभूळगाव खालसा, नागलवाडी, माही, जळगाव, पाटेगाव, पाटेवाडी, निमगाव डाकू व चापडगाव या गावांत बाधित शेतकऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या. त्यावर आमदार पवार व प्रांताधिकारी नष्टे यांनी उचित कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

आमदार पवार म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नगर-करमाळा मार्गाचे काम होत आहे. त्यासाठी आपण व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला. विकासासाठी दर्जेदार रस्ते होणे गरजेचे आहे. भूसंपादनात कोणावरही अन्याय होणार नाही.’’

अडचणी असल्यास फेरसर्वेक्षण

भूसंपादनाबाबत रस्त्याच्या दुतर्फा, तसेच बाह्यवळण रस्त्याच्या दराबाबत तफावत, तसेच मालमत्ता व इतर नोंदी नसल्याबाबत अनेकांनी आक्षेप नोंदविले. मात्र, जेथे अडचणी असतील, तेथे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. त्यावर कार्यवाही करण्याचे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते, परमवीर पांडुळे, श्यामभाऊ कानगुडे, नितीन खेतमाळस, मनोज खेडकर, रामदास चौघुले, सावन शेटे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, भूसंपादन अधिकारी ज्योती अवताडे, उपअभियंता अमित निमकर, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT