Nagar Sakal
अहिल्यानगर

राज्यातील कृषी विद्यापीठांचे कामकाज कोलमडणार ?

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये एकाच दिवशी १५० सेवानिवृत्त होणार ?

रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादा शासनस्तरावर सेवानिवृत्तीचे ६२ हुन ६० करण्याची शक्यता असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात जोरदार सुरू आहे. या चर्चेमुळे विद्यापीठातील (University) अनेकांना सेवानिवृत्त होण्याचे तसेच पदोन्नतीचे वेध लागले आहे. वर्ग एक व दोन मधील प्राध्यापक संवर्ग सध्या ६२, वर्ग तीन मधील कर्मचारी वयोमर्यादा ५८ व वर्ग चार मधील कर्मचारी यांना वय ६० इतकी आहे.

कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रिया गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली असून प्राध्यापक संवर्गातील अधिकाऱ्यांची निवृत्तीची वयोमर्यादा ६५ वर्ष करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तांत्रिक कर्मचारी संघटनेने कृषी विद्यापीठांचे कुलपती व राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी, राज्याचे कृषिमंत्री ना. दादा भुसे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना दिले आहे. राज्यामध्ये रिक्त पदांमुळे शिक्षकवर्गीय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून सुमारे ५५ टक्के रिक्त पदे असल्यामुळे याचा परिणाम विद्यापीठांच्या विस्तार, संशोधन व शिक्षण या कार्यावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. अनुभवी व पात्रताधारक शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काही पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर येणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

विद्यापीठाची अधिस्वीकृती तसेच घसरलेले मानांकन पाहता विद्यापीठातील पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. देशामध्ये गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार व इतर काही राज्यांमध्ये कृषी शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक संवर्गातील मंजूर पदे २३१९ आहेत, यामधील सुमारे ११०० पदे सध्या रिक्त आहेत व वयोमर्यादा ६२ वरून ६० झाल्यास आणखी सुमारे १५० पदे एकाच दिवशी सेवानिवृत्त होऊ शकतात. या पदांमध्ये संचालक, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ तसेच प्राध्यापक अशी अनुभवी व महत्वपुर्ण पदे आहेत.

सुमारे १५० अधिकारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाल्यास राज्यातील चारही विद्यापीठे खिळखिळे होऊन मोडकळीस येतील यात शंका नाही. राज्यांमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य व गृह खात्यातील हजारो पदे अद्यापही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, या पार्श्‍वभूमीवर कृषी विद्यापीठातील जागांची भरती कधी होणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

Samsung Galaxy च्या तीन नव्या सिरीज लाँच; 7 हजारपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्स अन् जबरदस्त ऑफर्स..

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Video: 'तुझं हे जे सुरुये ते बंद कर' निक्कीने आरबाजला झापलं! म्हणाली...'बाहेर काय सुरुये हे तुला...'

SCROLL FOR NEXT