baby esakal
अहिल्यानगर

ह्रदयद्रावक; ऐन नवरात्रात बेवारस 'नकुशी' मरीमातेच्या दारात

आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : स्त्री-भ्रूणहत्येविषयी रोज प्रबोधन केले जात आहे. तरीही त्या हत्या कमी होत नाही. मुलगा- मुलगी समान, असा संदेश दिला जात असला, तरी महिलांना- मुलींना सन्मानाची वागणूक मिळत नाही. तालुक्यातील सावरचोळ येथील गावठाणानजीकच्या मरीमातेच्या मंदिरात सुमारे एक महिना वयाचे स्त्री-अर्भक सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे. .

ह्रदयद्रावक; ऐन नवरात्रात बेवारस 'नकुशी' मरीमातेच्या दारात

तुकाराम रामभाऊ कानवडे वस्तीकडून गावाकडे येत असताना, त्यांनी मंदिरातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. तेथे कापडात गुंडाळलेले लहान मूल दिसले. त्यांनी पोलिस पाटील संजय कानवडे यांना ही माहिती दिली. त्यांच्यासह सरपंच अनिता कानवडे, संपत कानवडे, किरण, शुभम, दत्ता, अरविंद व अविनाश कानवडे या युवकांनी व अंगणवाडी सेविका वंदना कानवडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. संगमनेर तालुका पोलिसांनी अर्भकाला उपचारार्थ कॉटेज रुग्णालयात दाखल केले.

अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा

मुलगी झाली म्हणून ती मंदिराच्या दारात टाकली, की अनैतिक संबंधातून ती नकोशी झाली, हे पोलिस तपासात समोर येऊ शकते. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना सोमवार (ता. ११) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच स्टेडियममध्ये राडा! दोन तरुण भिडले, मारहाणीचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

Dam Leakage: डिंभे धरणाला गळतीचे ग्रहण; वर्षाला दोन टीएमसी पाणी वाया जाणार.

Jalgaon News: लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पतीसह तिघांना मारण्याचा प्रयत्न, विषप्रयोगानंतर नवविवाहिता फरार; जळगावातील धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Navratri Day 2 : ब्रह्मचारिणी

SCROLL FOR NEXT