MLA Nilesh Lanke  esakal
अहिल्यानगर

आमदारकीपेक्षा गरीबांच्या सेवेत आनंद : नीलेश लंके

सकाळ वृत्तसेवा



पारनेर (जि. अहमदनगर) : महाविकास आघाडी सरकार निश्‍चित न्याय देईल, फक्त थोडा धिर धरा. मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. मला आमदारकीपेक्षा गोरगरीबांच्या सेवेत खरा आनंद मिळतो. सर्व समस्या सरकार दरबारी मांडल्या आहेत. लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.


आमदार लंके यांनी पारनेर आगारातील आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्या वेळी ते कर्मचाऱ्यांबरोबर बोलत होते. कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर लंके म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. मी नुकतीच मुंबई येथे पवार यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात चर्चा केली आहे.

मी तुमच्या मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापर्यंत पोचविल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चितच न्याय देईल. आबा भोंडवे, संभाजी ठुबे, दत्ता कोरडे, सोमनाथ शहाणे, बलभिम कुबडे, कल्पना नगरे, स्वरूपा वैद्य, शितल मोरे, संगिता जाधव, सविता शिंदे, बापू शिंदे, संदीप शिंदे, राजू पठाण, संतोष ठुबे, सचिन थोरात, संजय पवार, गणेश चौधरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT