The number of corona patients increased in Rahuri 
अहिल्यानगर

राहुरीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढता वाढता वाढे...

विलास कुलकर्णी

राहुरी : कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यापासून काल (गुरुवारी) दिवसभरात प्रथमच तालुक्यात तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यातून दूर असलेल्या राहुरी तालुक्यात धोक्याची घंटा वाजली आहे.

तालुक्यात आजअखेर 24 जण पॉझिटिव्ह आढळले अाहेत. आठजण उपचारानंतर घरी परतले आहेत. उर्वरित सोळा रुग्णांपैकी बारा जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर चार जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तालुक्यात केसापूर (4), पाथरे (1), सोनगाव (2), सात्रळ (1), वांबोरी (2), तांदुळवाडी (2), म्हैसगाव (2), वरवंडी (1), राहुरी फॅक्टरी (3), शेटेवाडी (1), देवळाली प्रवरा (1), कात्रड (1), वळण (1), राहुरी शहर (1), तमनर आखाडा (1) येथील रहिवासी रुग्ण बाधित आढळले. तमनर आखाडा, सोनगांव, वळण येथील चार रुग्ण तालुक्याबाहेर रहात अाहेत. त्यांना बाहेरच संसर्ग झाला आहे. परंतु त्यांचा मुळपत्ता राहुरी तालुका असल्यामुळे नोंदणी राहुरी तालुक्यात झाली आहे. 

त्याशिवाय तालुक्याबाहेरील रहिवासी व्यक्ती वांबोरी (1), टाकळीमिया (2), राहुरी शहर (1) कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कोविड केअर सेंटरमध्ये आज दुपारी बारा वाजेपर्यंत 85 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तालुक्यात एकाच दिवशी नऊजण कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

बाधित ठिकाणांचा परिसर आज सील करण्यात आला. नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे, गर्दीत जाणे टाळावे. सोशल डिस्टन्सींग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करावा. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 
 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT