अहिल्यानगर

करंजीत दरोडा, मारहाणीत एक ठार एक जखमी

पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास भावले वस्तीवर दरोडा पडला

सकाळ वृत्तसेवा

करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास भावले वस्तीवर दरोडा पडला.

या दरोड्यात दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले (वय ८० ) यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले (वय ७६ ) यादेखील या घटनेत गंभीर जखमी झाल्त्या आहेत. या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी येऊन तपासाची चक्रे वेगाणे फिरवली.

या घटनेत जखमी भावले या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दरोडेखोरांनी ओरबडून नेली. तर मयत गोपीनाथ भावले यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता. आजूबाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये म्हणून त्यांच्या घरावर देखील दरोडेखोरांनी दगडफेक केली. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचा या दरोड्यामध्ये जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. करंजी गावचे सरपंच बाळासाहेब आकोलकर यांनी भेट देऊन भावले कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam Result: महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी आणि १२वी निकालावर संकट! निकाल उशिरा लागण्याची शक्यता; कारण काय?

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Live Update: झोजिला खिंडीजवळील शैतान नल्ला येथे हिमस्खलनामुळे अनेक वाहने सापडली

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT