Parayan of the Constitution in Hiware Bazaar 
अहिल्यानगर

हिवरे बाजारमध्ये चाललंय पारायण, पण कशाचं...वाचा तर

दत्ता इंगळे

नगर तालुका ः ग्रामीण भागात श्रावणात भक्तिमय वातावरण असते. आजही घरोघरी धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते. मात्र, आदर्श गावात वेगळ्याच ग्रंथाचे पारायण होणार आहे. अर्थातच गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी ही संकल्पना मांडली आहे.

आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उद्यापासून (सोमवार) रोज सायंकाळी सहा ते सातदरम्यान भारतीय राज्यघटनेचे पारायण केले जाणार आहे. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून हे पारायण केले जाईल.

ग्रामस्थांना राज्यघटनेसह विविध कायदे व नियमांची माहिती विस्तृतपणे व्हावी, यासाठी राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

श्रावणात गावोगावी विविध ग्रंथांचे वाचन होते. सध्या कोरोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती कायम आहे. हिवरेबाजार येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, विठ्ठल-रुक्‍मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाच्या नियमांचे अतिशय काटेकोर पालन केल्यामुळे, आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. 

सध्या कोरोनामुळे ग्रामस्थ धास्तावले आहे. या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी हिवरेबाजार येथे या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ग्रामस्थांनी घरात धार्मिक ग्रंथांचे पारायण करावे. त्यातून नक्कीच मनोबल वाढेल. ताणतणाव दूर होऊन आनंद मिळेल. कुटुंबातील स्नेहभाव वाढेल व निष्कारण बाहेर फिरणे कमी होऊन नियमांचे पालन होईल, असे मत पवार यांनी व्यक्त केले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

SCROLL FOR NEXT