corona
corona 
अहमदनगर

नगर शहरातील हा भाग झालाय.... कन्टेन्मेंट झोन 

सकाळ वृत्तसेवा

नगर : शहरात गेली दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कापड बाजारमधील कोरोना बाधितांच्या संपर्कातील कोरोना रुग्णांची साखळी दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. सिद्धार्थनगरमधील कोरोना बाधितांचे लोण काल (मंगळवारी) गवळीवाड्यात पोचले. आज गवळी वाडा व सिद्धार्थनगर जवळील कवडेनगरमध्येही कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येत आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर कन्टेन्मेंट झोन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी घेतला आहे. 

सिद्धार्थनगर कन्टेन्मेंट झोन जवळील गवळी वाडा येथे 12 कोरोना बाधित रुग्ण काल आढळून आले. त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींची साखळी शोधताना महापालिकेला आज कवडेनगरमध्ये सहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकाच दिवशी सहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने कवडेनगर कन्टेन्मेंट झोन करण्याचा आदेश महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी दिला. त्यानुसार हा परिसर महापालिकेच्या पथकाकडून सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

कवडेनगर कन्टेन्मेंट झोन झाल्यामुळे शहरातील कन्टेन्मेंट झोनची संख्या व आकार वाढला आहे. शहरातील सिद्धार्थनगर, कवडेनगर, तारकपूर, दिल्लीगेट, वाघगल्ली, आडतेबाजार, पद्मानगर हा परिसर सध्या कन्टेन्मेंट झोन आहे. यातील दिल्लीगेट व वाघगल्लीचा कन्टेन्मेंट झोन कालावधी आज मध्यरात्री संपणार असला तरी शहरातील कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता परिसरातील कन्टेन्मेंट झोन वाढण्याची शक्‍यता आहे. 

कॉटेज कॉर्नर परिसरात दोन रुग्ण 
शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील कॉटेज कॉर्नर परिसरात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण एकाच घरातील असल्याचे समजते. कॉटेज कॉर्नर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.  अहमदनगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

World Asthama Day 2024 : तुमचं वाढलेलं वजन दम्याला अधिकच गंभीर बनवते, हे खरंय का?

SCROLL FOR NEXT