This part of Rahuri became a containment and buffer zone 
अहिल्यानगर

राहुरीतील हा भाग झाला कंटेन्मेंट आणि बफर झोन

विलास कुलकर्णी

राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे आज (शनिवारी) दोनजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दोन दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी व शेटेवाडी येथे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

राहुरी फॅक्टरी परिसरात कोरोना बाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे. त्यामुळे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आज राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत व तनपुरे कॉलनी येथे चौदा दिवस कंटेन्मेंट झोन व त्यांच्या आसपासच्या दोन किलोमीटर परिसरात बफर झोन जाहीर केला.

आज तालुक्यात कोरोना बाधितांची 27 वर पोहोचली आहे. काल (शुक्रवारी) रात्री गुहा येथील एक जणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आठ जण उपचारानंतर घरी परतले आहेत. एकोणावीस जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पैकी पंधरा जणांवर शासनातर्फे तर चार जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहतीमधील पती-पत्नी यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे, देवळाली प्रवरा पालिका प्रशासनातर्फे गुरुकुल वसाहत परिसरातील रस्ते व इमारतींवर निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली. सर्व रस्ते सील करण्यात आले.

दोन दिवसापूर्वी तनपुरे कॉलनीतील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे, तहसीलदार शेख यांनी गुरुकुल वसाहत व तनपुरे कॉलनी कंन्टेनमेंट झोन जाहीर केले. आसपासचा दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे. त्यामुळे, राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक गरजे शिवाय घराबाहेर पडता येणार नाही. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाठलाग करतानाचा थरारक Video

Chakan Update : पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार; चाकणमध्ये पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांचा इशारा

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात; ‘कोठडीतील मृत्यूच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांसाठी शपथपत्र दाखल करा’

सर्जरी अर्धवट सोडली अन् नर्ससोबत संबंध ठेवण्यासाठी गेला पाकिस्तानी डॉक्टर, दुसऱ्या नर्सनं आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्...

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT