Pike Jomat; But the farmer in a coma
Pike Jomat; But the farmer in a coma 
अहमदनगर

पिके जोमात; पण शेतकरी कोमात !

विनायक लांडे

नगर ः यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने, कधी नव्हे तो जूनमध्येच खरिपाचा 100 टक्के पेरा मार्गी लागला. आंतरमशागतीची कामेदेखील सुरू आहेत. पावसाची साथ मिळाली असली, तरी पिके जोमात असताना, मागील आठ दिवसांपासून युरिया बाजारातून गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरी कोमात गेल्यासारखी अवस्था झाली आहे. बाजारात बळिराजाचे हेलपाटे सुरूच असून, त्वरित युरिया उपलब्ध व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा या सर्व नक्षत्रांमध्ये पावसाने जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर हजेरी लावली. एक जूनच्या मुहूर्तावरच जिल्ह्याच्या शिवारावर पावसाची बरसात सुरू झाली. मार्च महिन्यापासून शहर, महानगरे कोरोना प्रतिबंधाच्या तडाख्यात अडकली होती. याही परिस्थितीत खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीची तयारी सुरूच होती. जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी तूर, मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन ही खरीप हंगामातील पिके आर्थिक मदतीचा कणा मानली जातात. यंदा कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात चार लाख 44 हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. आता पिकांना बळ देण्यासाठी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून खते व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांमध्ये "युरिया मिळणार नाही,' असे फलक लावण्यात आले आहेत. तरीही शेतकऱ्यांचे खतांच्या दुकानांपुढे हेलपाटे सुरूच आहेत. बाजारातून युरिया गायब झाल्याने शेतकरी हवालदिल आहे. 

मायबाप सरकारने युरिया उपलब्ध करून द्यावा 
यंदा पावसाने कृपावंत होत शिवारात समाधानकारक साथ दिली. पिके जोमात असल्याने आता युरियाची आवश्‍यकता आहे. गेल्या आठ दिवसांपासून युरियासाठी दुकानात हेलपाटे मारत आहे. मात्र, युरियाच उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जाते. मायबाप सरकार, प्रशासनाने युरिया उपलब्ध करून द्यावा. 
- वसंत राळेभात, शेतकरी 

...तर आवाज उठवला जाईल 
युरियाचा तुटवडा मागील आठ दिवसांपासून जाणवत आहे. सरकारकडे मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर युरियाचा पुरवठा करावा, यासाठी आवाज उठवला जाईल. 
- संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य 

संपादन ः विनायक लांडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT