Pits everywhere on the road 
अहिल्यानगर

या शहरातील रस्त्यांची झाली गाडी वाट... जागोजागी खड्डे 

सुनील नवले

श्रीरामपूर ः शहरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेवासे रस्ता, संगमनेर रस्ता, बेलापूर रस्ता, शिवाजी रस्ता, गोंधवणी रस्त्यासह दोन्ही कालव्यांनजीक विविध रस्त्यांवर अनेक ठिकाणी शेकडो खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यावर वाहनचालकांना कसरत करावी लागते. 

नेवासे-संगमनेर रस्त्यावर दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात अनेक मालवाहू मोटारींचा समावेश असतो. शहरातील रस्त्यांवरून होणारी अवजड वाहतूक खड्ड्यांना निमंत्रण देत असते. रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडतात. वाहनांचे नुकसान होते, तसेच चालकांचे मणकेही खिळखिळे होत आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना मानेचे आजार जडले आहेत. 
पालिकेने अनेकदा खड्डे बुजविले. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले; परंतु खड्डे कायम आहेत. दर वर्षी पावसाळा आला, की शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्ते खचतात. उन्हाळ्यात धुळीचा त्रास, तर पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांना सामोरे जावे लागते. अनेक पुलांवर पावसाचे पाणी काढण्यासाठी व्यवस्था नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी साचते. 

भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर ते उडते. तक्रार करेपर्यंत वाहने निघून जातात. शहरातील रेल्वे भुयारी पुलाखाली नेहमी पाणी साचते. पाणी काढण्यासाठी ठोस यंत्रणा नसल्याने वाहनचालकांना वाहने कशीबशी काढावी लागतात. खड्डे आणि खड्डेमय रस्ते, असे येथील कायमचे समीकरण झाले आहे. दत्त भुवनसमोरील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी काहींनी घरांच्या पाडकामाचे साहित्य आणून टाकले. त्यामुळे लहान वाहनांची अडचण झाली. पाणी साचल्याने दुचाकीस्वार घसरून पडतात. शिवाजी चौकातील वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे चारही बाजूंनी गतिरोधक उभारले. त्यांची उंची अधिक केल्याने, अनेकांची कोंडी होते. गोंधवणी रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक तयार केले असून, वाहतूक कोंडी वाढली आहे. शहरातील रस्त्यांची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. अहमदनगर 

संपादन - सूर्यकांत वरकड 
.... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - १२ नोव्हेंबर २०२६

Abhishek Sharma: "ओह माय गॉड, अभिषेक!" स्टार क्रिकेटपटूची शाळेतल्या शिक्षिकेला दिवाळीत सरप्राईज भेट; Viral Video

वक्री शुक्र करणार मालामाल! पुढील ४ दिवस 'या' ५ राशींना होणार धनलाभ, करिअरमध्ये प्रगती अन् सुखाचे दिवस

Fertilizer Subsidy Hike : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खतांच्या अनुदानात तब्बल ६४% वाढ, DAP ची गोणी कितीला मिळणार?

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

SCROLL FOR NEXT