Police found the accused at a temple in Parner 
अहिल्यानगर

पोलिसांना महादेव पावला... हातून पळालेला आरोपी मंदिरात घावला

सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या व बाल लैंगीक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील पळून गेला.  आरोपी प्रवीण पोपट गायकवाड यास आज गुरूवारी (ता. 14 ) पहाटे पाच वाजणेच्या सुमारास वडनेर हवेली येथे डोंगरावरील महादेवाच्या मंदीरातून ताब्यात घेतले.

प्रविण याने वडझिरे येथील अल्पवयीन मुलीस चार मे रोजी पळवून नेले होते. त्या मुलीच्या वडीलांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात पाच मे रोजी  पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या नंतर पोलीसांनी त्यास शनिवारी अटक केली. त्यास सात दिवसांची पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली आहे.

आरोपीस त्रास होत असल्याने पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे व त्यांचे सहकारी यांनी ग्रामिण रूग्णालयात तपासणीसाठी नेले असताना प्रविण याने पोलीसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला होता. अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला होता. 

आरोपी पळाल्याने पोलिसांनी सापळा लावला. गुप्त माहितीनुसार पोलीसांनी त्यास पकडले. आरोपी प्रवीण याने आपल्या मित्राला मला नेण्यासाठी एक दुचाकी पाठवा व भूक लागली आहे काहीतरी खाण्यास पाठवा, असे सांगितले होते. मित्राने त्यास घरात शिल्लक असलेल्या पु-या व झोपण्यासाठी गोधडीही दिली. मात्र, ही माहिती लिक झाल्याने आरोपी आयता पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या कारवाईत पोलीस उप निरीक्षक बोत्रे यांच्या सह हवलदार भालचंद्र दिवटे,रोकडे आदींचा समावेश होता.
रात्री थोडा पाऊस येत असल्याने दुचाकी आली. मात्र पावसामुळे तो मंदिरातच थांबला व तेथेच झोपी गेला, त्यामुळे तो पोलिसांच्या हाती सापडला.

आरोपी सापडल्याने पोलिसांनी टाकला सुटके निश्वास

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज सायंकाळपर्यंत पोलीसांना त्यास शोधून काढा अन्यथा कारवाईस सामोरा जा असा सज्जड दम भरला होता. मात्र, पोलिसांचे दैव बलवत्तर आरोपी आज पहाटेच सापडला. पोलीस खात्याची बदनामी व त्यांच्यावरील वरील पुढील कारवाईसुद्धा टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT