A police investigation has revealed that the accused was an employee of Gautam Hirans shop in Belapur  
अहिल्यानगर

हिरण यांचा नोकरच ठरला कर्दनकाळ

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : दुकानात काम करणारा नोकरच बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचा कर्दनकाळ ठरल्याचे पोलिस तपासात समोर आले. पैशांसाठी हिरण यांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, अपहरणानंतर पोलिस प्रशासन लगेच सतर्क झाले होते. आरोपीपैकी एक जण हिरण यांच्या ओळखीचा होता. त्यामुळे त्यांना सोडल्यास सर्वच पकडले जाण्याची भीती आरोपींना असल्याने, त्यांनी हिरण यांची मोटारीतच हत्या केली. पैशांची गरज असल्यानेच आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

हिरण यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. दोन संशयित आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्यातील एक आरोपी हिरण यांच्या दुकानात अनेक वर्षांपासून काम करीत होता. खंडणीसाठी या नोकरासह आरोपींनी हिरण यांच्या अपहरणाचा कट रचला. घटनेच्या दिवशी दुचाकी बंद पडल्याचा बनाव करीत संबंधित नोकर पक्कड आणण्यासाठी हिरण यांना सोबत घेऊन गेला.

बेलापूर बाह्यवळण परिसरात जाताच आरोपींनी हिरण यांना मोटारीत ओढत तेथून पळ काढला. सर्व आरोपींनी मास्कद्वारे चेहरे लपविले होते. अपहरणानंतर हा प्रश्न राज्यभर गाजला. थेट विधिमंडळात त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे पोलिसांनीही आरोपींचा कसून शोध सुरू केला. हत्येनंतर हिरण यांचा मृतदेह आरोपींनी वाकडी शिवारात आणून टाकला. त्यानंतर पोलिसांनी शहरातील दोन जणांना संशयातून पकडले. त्यामुळे मुख्य आरोपी बेसावध झाले. मात्र, पोलिसांचा तपास पुढे सुरूच होता.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नाशिकमधून एकास पकडले. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अन्य आरोपींना गडाआड केले. त्यांतील एक आरोपी वाहनचालक, एक आरोपी नोकरी करतो, तर दोन आरोपी लहान-मोठी कामे करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. साक्षीदारांच्या माहितीनुसार, हिरण यांना मोटारीतून नेताना आरडाओरडा झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत मोटारीच्या प्रवासाचा मार्ग काडून तिच्या मालकाचा शोध घेतला. त्यातून मोटारीवरील चालकाची माहिती मिळाली. त्यातून पोलिसांनी मुख्य आरोपी पकडले.

आरोपींनी १०-१२ दिवसांपूर्वी अपहरणाचे नियोजन केले असावे. सर्व आरोपींनी हिरण यांच्या अपहरणाच्या आदल्या दिवशी रविवारी (ता. २८) बेलापूर- राहुरी बाह्यवळण परिसराची पाहणी केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर आरोपींनी मोबाईलमधील सिमकार्ड फेकून दिले होते, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT