bikes esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : भिंगार पोलिसांकडून 65 बेवारस वाहन मालकांचा शोध

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : भिंगार कॅम्प पोलिस ठाणे व गंगामाता वाहन शोध संस्थेच्या अभिनव उपक्रमांर्तगत 65 बेवारस वाहन मालकांचा शोध लावण्यात यश आले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.

शेकडो वाहने वर्षांनुवर्षे धुळखात पडून

भिंगार कॅम्प पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेले तर काही अपघातातील वाहने पोलिस ठाण्याच्या परिसरात आणून लावली होती. शेकडो वाहने न्यायालयीन प्रक्रिया, तसेच मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलिस ठाणे आवारातच वर्षांनुवर्षे मालकाच्या प्रतिक्षेत धुळखात पडून होती. ही बाब लक्षात घेऊन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. वाहनांचे चेसीस व इंजीन नंबरवरून आठ दिवसांत 65 वाहनांच्या मूळ मालकांचा शोध मावळ तालुक्‍यातील परंदवाडी (जि. पुणे) येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलिसांनी शोध घेतला.

वाहन मालकाने वाहनांचे नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार, चेसीस, इंजीन नंबर, वाहन मालकाचे नाव, पत्ता यांची यादी पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली आहे. शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी आपली, वाहनांची ओळख पटवून व पुरावे देऊन वाहन परत घेऊन जाण्याचे आवाहन भिंगार कॅम्प पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, मुद्देमाल कारकून सहाय्यक उपनिरीक्षक आर. एस. वैरागर, पोलिस नाईक राहुल द्वारके, संतोष आडसूळ, संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब वागडे, भारत वाघ, गोरख नवसुपे, संजय काळे यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर

"दागिन्यांच्या जाहिरातीत माझ्यासारख्या मुलीला.." प्रियदर्शिनीच्या बहिणीची रवी जाधव यांच्यासाठी भावूक पोस्ट

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

अल्पवयीन मुलींना गर्भपातास परवानगी, पण बाळाला जन्म दिल्यास काय होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Why Acidity Suddenly Increases : उन्हाने पोट दुखतं, पित्ताशयात खडे तर नाहीत ना? ॲसिडिटीचाही होतोय त्रास? कडक उन्हाळ्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT