All-party leaders submit a memorandum to the police demanding withdrawal of case against Prakash Chitte. esakal
अहिल्यानगर

Ahilyanagar Politics : प्रकाश चित्ते यांच्यावरील गुन्हा मागे घ्या; सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पोलिसांकडे मागणी

Withdraw Case Against Prakash Chitte: प्रकाश चित्ते यांची प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. श्रीरामपूरमध्ये सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची अनिष्ट परंपरा सुरू होत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पूर्वीही अशा प्रकारचे कट सर्वपक्षीय एकजुटीने उधळून लावण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : मुल्ला कटर बलात्कार प्रकरणातील साक्षीदार महिलेस धमकी दिल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्याविरोधात दाखल गुन्हा हा पूर्णपणे खोटा आहे. तो एका नियोजित राजकीय षड्यंत्राचा भाग आहे, असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुथा, सिद्धार्थ मुरकुटे, संतोष कांबळे, राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांची भेट घेऊन गुन्हा तत्काळ मागे घेण्याची मागणी केली.

मुथा म्हणाले, हे प्रकरण अतिशय नियोजनबद्ध आहे. प्रकाश चित्ते यांची प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. श्रीरामपूरमध्ये सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची अनिष्ट परंपरा सुरू होत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पूर्वीही अशा प्रकारचे कट सर्वपक्षीय एकजुटीने उधळून लावण्यात आले आहेत. पोलिसांनी दबावाखाली न येता सत्य तपासून बाहेर काढावे.

शिष्टमंडळाने स्पष्ट इशारा दिला की, जर या प्रकरणात चुकीची कारवाई झाली, तर तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल आणि श्रीरामपूर बंदची हाक देण्यात येईल. या शिष्टमंडळात शशिकांत कडूस्कर, संजय पांडे, राजेभाऊ कांबळे, किरण लुणिया, बबन मुठे, गौतम उपाध्ये, दीपक चव्हाण, गणेश भिसे, बाळासाहेब गाडेकर, संजय यादव, राजेंद्र पाटणी, सुरेश सोनवणे, संदीप वाघमारे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. या प्रश्नी आता पोलिस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Deshmukh: विधीमंडळात ज्या नितीन देशमुखांना मारहाण झाली ते नेमके कोण आहेत?

Kolhapur Killing Case : रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन बेनाडेचा खून, संशयित आरोपी पोलिसांना शरण; संकेश्र्वरात मृतदेहाचा शोध सुरू

Morning Diet: सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? डॉक्टरांनी सांगितले कारण

मे-जूनमध्ये शेतीत काम नसतं, शेतकरी रिकामेच असतात.. तेव्हा गुन्हेगारी वाढते; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं विधान

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात; अण्णाभाऊ साठे महामंडळातील वास्तव,नागपुरात केवळ एकाच महिलेला कर्ज!

SCROLL FOR NEXT