The power company cut off power supply to the Jayakwadi water supply scheme on Tuesday 
अहिल्यानगर

जायकवाडी पाणी पुरवठा योजनेची वीज तोडली; अनेक गावांमध्ये पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी (अहमदनगर) : उन्हाळ्यात पाथर्डी नगरपरिषद व १९ गावाची पिण्याची पैठणच्या जायकवाडी पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज कंपनीने मंगळवारी खंडीत केला आहे. शहरात येणारे पाणी बंद झाल्याने पालिका हतबल झाली आहे. शेवगाव व पाथर्डीसाठी एकच योजना आहे. पाथर्डी पालिकेकडे योजनेची थकबाकी नाही. मात्र शेवगाव पालिकेकडे दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची थकबाकी असल्याने व वीजकंपनीची थकबाकी वाढल्याने कंपनीने वीजपुरवठा खंडीत केला आहे. 

प्रांतअधिकारी देवदत्त केकाण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अनिल सानप यांनी बुधवारी शेवगाव नगरपालिकेच्या अधिका-यांशी चर्चा करुन थकबाकीची रक्कम भरावी यासाठी आग्रह धरला आहे. पैठणच्या धरणात मुबलक पाणी आहे. जायकवाडी योजनेतून शेवगाव -पाथर्डी व ग्रामीण भागातील काही गावांना पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. योजना जिल्हा परिषद चालविते. पाथर्डी व शेवगाव पालिका योजनेचे ग्राहक आहेत. पाथर्डी पालिकेने पाणी योजनेचे बिल अदा केले आहे. थकबाकी नाही. मात्र शेवगाव पालिकेकडे योजनेची दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची थकबाकी आहे. 

वीजकंपनीची लाखो रुपयाची थकबाकी योजनेकडे आहे. त्यामुळे विजबील भरा अन्यथा विजजोड मिळणार नाही, अशी भूमिका वीजवितरण कंपनीने घेतली आहे. शेवगाव -पाथर्डीकर पाण्याविना राहणार आहेत. प्रांतअधिकारी देवदत्त केकाण व उपअभियंता अनिल सानप यांनी शेवगाव पालिकेकडे जाऊन थकबाकीची रक्कम भरा म्हणजे वीज कंपनीला पैसे भरता येतील असे सांगितले. बुधवारी दोन्ही पालिका, महसूल, वीजवितरण कंपनी यांच्या अधिका-यांच्या बैठका सुरु होत्या. रात्री उशीरापर्यंत यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे केकाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराहला IND vs PAK सामन्यात खेळवलं नाही तरी चालेल! सुनील गावस्कर यांना नेमकं म्हणायचंय तरी काय?

Royal Enfield Hunter 350: जीएसटी घटल्यानंतर बुलेटची किंमत किती? सगळ्या मॉडेल्सच्या प्राईज जाणून घ्या

Bin Lagnachi Goshta : बॉलिवूडकरांनी केलं 'बिन लग्नाची गोष्ट’चे कौतुक; सिनेमाची होतेय चर्चा

Latest Marathi News Updates : वसईच्या गिरीराज कॉम्प्लेक्समधील कंपनीला भीषण आग

Shirurkasar Flood: महापुरानंतर बेपत्ता; शिरूरकासार तालुक्यातील ६९ वर्षीय नागरिकाचा चौथ्या दिवशीही काहीसा ठावठिकाणा नाही

SCROLL FOR NEXT