Prashant Gaikwads pursuit to increase the e tender system limit of labor organizations up to 10 lakh has been successful  
अहिल्यानगर

नगर - मजुर संस्थांच्या निविदा 10 लाखापर्यंत; जिल्हा बँकेच्या गायकवाड यांच्या प्रयत्नांना मोठे यश

सकाळ वृत्तसेवा

पारनेर (अहमदनगर)  : मजूर संस्थांना देण्यात येणाऱ्या कामांच्या निविदा प्रणालीमध्ये तीन लाखांवरून १० लाख रूपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

गायकवाड यांनी संचालक म्हणून निवडून आल्यानंतर गायकवाड यांनी राज्यातील मजूर सहकारी संस्थांपुढे अनंत अडचणी आहेत. त्यातच १० वर्षांपूर्वी कामांचे वितरण करताना १५ लाख रूपयांपर्यंतची कामे मजूर संस्थांना देण्यात येत होती. मात्र मागील सरकारच्या काळात ही मर्यादा तीन लाखांपर्यंत केली. वास्तविक सिमेंट, लोखंड, खडी, वाळू, डांबर याच्या वाढलेल्या किंमतीचा विचार करता तीन लाख रूपयांपर्यंत कोणतेही काम होणे शक्य नाही. त्यासाठीच कामांच्या मार्यादेत वाढ करणे अत्यंत गरजेचे होते.

या मागणीसाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हाच मुददा महत्वाचा ठरला होता. गायकवाड यांनी पवार व थोरात यांची भेट घेऊन अधिवेशनात हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे साकडे घातले होते. त्यानुसार पवार यांनी बुधवारी विधानसभेमध्ये कामाची मर्यादा तीन लाखांवरून १० लाख करण्याची घोषणा केली.

विधानसभेत या विषयावर बोलताना पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करीत त्यांच्या काळात कामाची मर्यादा वाढविण्यासाठी दोन्ही बाजूंचे सदस्य मागणी करीत असतानाही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले. दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच राज्यातील मजूर संस्थांच्या प्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन ही वाढ करण्यात येत असल्याचे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून गायकवाड यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.

मजूर संस्थांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्‍नावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबददल प्रशांत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना धन्यवाद दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT