Rayat Sevak Vikas Aghadi has decided to contest the upcoming elections of Rayat Sevak co operative Bank 
अहिल्यानगर

रयत सेवक विकास आघाडी निवडणूक लढणार

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बॅंकेची आगामी निवडणूक लढवण्याचा निर्णय रयत सेवक विकास आघाडीने घेतला आहे. आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा येथे नुकताच एक मेळावा पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष चांगदेव कडू, विठ्ठल बोरुडे, वाय. जी. वाबळे, संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गांगर्डे, उपाध्यक्ष शाहूराव औटी, सचिव जयवंत ठाकरे, सहसचिव कैलास खैरनार, खजिनदार, सुनील बनकर उपस्थित होते. 

जून 2020 मध्ये रयत बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. परंतु कोरोनामुळे निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यामुळे संचालक मंडळालाही मुदतवाढ मिळाली. आता राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवल्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रयत सेवक विकास आघाडी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. यापूर्वी दोन वेळा बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र यावेळी सभासदांच्या हितासाठी संघटना पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. समायोजित शिक्षकांना बॅंकेचे सभासदत्व देणे. सभासदांना त्यांच्या हक्काचा लाभांश मिळवून देणे, सभासदांच्या पाल्यांसाठी माफक दरात शैक्षणिक कर्ज योजना राबविणे असे अनेक निर्णय मेळ्यात सर्वानुमते घेण्यात आले.

यावेळी पारनेर येथील पदाधिकारी संजय चव्हाण यांना संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीला मुख्याध्यापक रमेश वेताळ, दिलीप बनकर, पी. बी. सोनुने, आर. ए. गायधने, यु. ए. कुताळ, व्ही. एस. बारस्कर, राजेंद्र गायकवाड, आर. ए. गायधने, डी. एस. मुरूमकर, कैलास खैरनार उपस्थित होते. नगर, नाशिक, बीड, कोकण, पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT