Read the new Khawti scheme for tribals, who are the beneficiaries 
अहिल्यानगर

आदिवासींसाठी आली नवीन खावटी योजना, कोण कोण लाभार्थी आहेत वाचा

शांताराम काळे

अकोले : राज्यात उदभवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा शासन निर्णय 9 सप्टेंबर 2020 रोजी निघाला आहे.

28 जून, 2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये खावटी कर्जाचे वाटप हे 100 टक्के रोखस्वरुपात करण्यात आले होते. सध्या कोविड विषाणुमुळे निर्माण झालेली आपात्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी 100 टक्के रोखीने खावटीकर्ज वाटप करण्याच्या निर्णयातून सूट देऊन ही योजना 100 टक्के अनुदानित योजना 1 वर्षासाठी (सन 2020-21) पुनश्‍च सुरू करण्यास व या योजनेचा लाभ 50 टक्के रोख व 50 टक्के वस्तू अनुदान स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना प्रती कुटुंबीय अनुदान ज्यामध्ये दोन हजाराच्या किमितीच्या वस्तू स्वरुपात बॅंक/डाक खात्यात वितरीत केले जाईल. खावटी अनुदान योजनेची अंमलजावणी आदिवासी विकास महामंडळ करील. 

यांना मिळेल लाभ 
मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर (दि. 1 एप्रिल , 2019 ते 31 मार्च , 2020 या कालावधीत)कुटुंब संख्या 4 लाख, आदिम जातीचे सर्व कुटुंबे 2 लाख 26 हजार, पारधी समाजाचे सर्व कुटुंबे 64 हजार, जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्‍चित केलेली सर्व गरजू आदिवासी कुटुंबे, ज्या मध्ये परितक्‍त्या, घटस्फोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब 3 लाख वैयक्तिक वन हक्क प्राप्त झालेली वन हक्कधारक कुटुंबे 1 लाख 65 हजार असे 11 लाख 55 हजार कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळेल. 

वस्तुरूपाने देण्यात येणारे धान्य 2 हजार रुपयापर्यंत मिळेल. त्यात मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहा पत्ती यासाठी 11. 55 लाख कुटुंबियांना प्रत्येकी चार हजार रूपये दिले जाईल, असे उपसचिव ल. गो . ढोके यांनी सांगितले. 

पिचड यांचे योगदान 
यापूर्वी आदिवासी विकास विभागाने आदिम जातीसातीच खावटी योजना कार्यान्वित केली होती. या बाबत भाजपचे माजी आमदार वैभव पिचड व राज्यातील आदिवासी संघांनी आवाज उठवून सरकारला पूर्वीचा बदलून नवीन खावटी निर्णय घ्यावा लागला. 9 सप्टेंबरचा आदेश काढून तो 11 लाख 55 हजार कुटुंबासाठी जाहीर केल्याने पिचड यांनी समाधान व्यक्त केले. याबद्दल आदिवासी विकास मंत्र्यांना धन्यवाद दिले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv sena Pune Election: पुण्यात शिवसेनेची युती तुटली? १२३ जागांवर पक्ष स्वतंत्र लढणार? पडद्यामागे काय घडलं?

Sangli Election : ‘माघार घे, तुला कॉप्ट करतो! ’महापालिका निवडणुकीत नेत्यांचे नवे गाजर; सांगलीत ‘स्वीकृत’ राजकारण चर्चेत

Latest Marathi News Live Update : भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

धक्कादायक! नववर्षानिमित्त मिठाई देण्यासाठी घरी बोलावलं अन् प्रेयसीनं चाकूनं प्रियकराचं गुप्तांगच कापलं, मुंबईत काय घडलं?

Jaipur Tourism: पर्यटकांच्या खिशाला लागणार कात्री! जयपूरच्या ऐतिहासिक स्थळांचे तिकीट झाले दुप्पट; जाणून घ्या नवीन शुल्क

SCROLL FOR NEXT