Rehekuri Sanctuary has been opened for tourists.jpg
Rehekuri Sanctuary has been opened for tourists.jpg 
अहमदनगर

पर्यटकांसाठी खुशखबर ! रेहेकुरी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : कोरोनामुळे गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेले तालुक्‍यातील रेहेकुरी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, पर्यटकांना कोरोना प्रतिबंधकात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी स्पष्ट केले.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
कर्जतपासून चार किमीवर रेहेकुरी येथे 2.17 चौरस किमी अशा विस्तीर्ण क्षेत्रावर काळवीट अभयारण्य विखुरले आहे. हिरवीगार वनश्री, रंगीबेरंगी फुलपाखरे, विविध प्राणी-पक्षी या अभयारण्यात मुक्त संचार करीत आहेत. काळवीट, चिंकारा, लांडगा, कोल्हा, कापशी, माळटिटवी, जंगली कबुतर, शिंपी, गाय, बगळा, चित्रबलाक, धामण, नाग आणि कॉमन रोझ, कॉमन गार्डन लिझार्ड, कॉमन इंडियन हे सरडे, तर कॉमन रोझ, स्ट्रिपड टायगर या फुलपाखरांच्या प्रजाती येथे आढळतात. भटकंती करताना त्याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. नीम, सिसू, खैर, हिवर, बोर या झाडांच्या, तसेच कुसाळी, डोंगरी मारवेल आणि पवण्या गवताच्या जाती आढळतात.

सावधान ! लग्नासाठी नवा नियम; पाळला नाहीत तर होणार कारवाई
 
विस्तीर्ण अभयारण्यात फिरताना दाट, उंच झाडीमुळे कधी कधी काळवीट, हरणांचे दर्शन होत नाही. त्यासाठी खास टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. त्यावरून आपल्याला, प्राणी कुठे आहेत, याचा नेमका अंदाज येतो. मात्र, येथे दुर्बिणीची व्यवस्था करण्याची पर्यटकांची मागणी आहे. येथे तीन निवासस्थाने आहेत. त्याद्वारे जंगलात राहण्याचा अनुभव घेता येतो. तंबूत भोजन, शयनकक्ष, प्रसाधनगृहाची सुविधा आहे. ठिकठिकाणी कचराकुंड्या आहेत. माहितीसाठी निसर्गपरिचय केंद्र उभारले आहे. 

कोरोनामुळे रेहेकुरी अभयारण्य बंद होते. आता ते सुरू होत आहे. पर्यटकांनीही अभयारण्याचे व कोविडचे नियम पाळून वनपर्यटनाचा आनंद घ्यावा. पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा प्रयत्न अभयारण्य प्रशासन करील. 
- सागर केदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, रेहेकुरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT