The revenue administration has for the first time introduced royalties on electricity bills to crusher operators 
अहिल्यानगर

खडीक्रशर यांचा बेमुदत बंद; वीजबिलावर रॉयल्टी भरण्यास व्यावसायिकांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महसूल प्रशासनाने प्रथमच क्रशरचालकांना वीजबिलांवर रॉयल्टी सुरू केली. नगर तालुक्‍यातील क्रशरचालकांना तब्बल 165 कोटींच्या वसुलीसाठी नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे क्रशरचालक संतापले असून, प्रशासनाच्या निर्णयाविरोधात खडीक्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

नगर तालुका क्रशरचालक सेवा संघाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत, तालुक्‍यातील कापुरवाडी, पोखर्डी, खंडाळा, चास, घोसपुरी, सारोळा कासार, निंबोडी, देहेरे, मांडवा, राळेगण म्हसोबा, आगडगाव, वारुळवाडी येथील क्रशरचालकांनी व्यवसाय बंद ठेवले. आतापर्यंत ठराविक रॉयल्टी दिली जात होती. त्याप्रमाणे क्रशरचालक शासनदरबारी रॉयल्टी भरत होते. मात्र, यंदा प्रथमच महसूल प्रशासनाने तालुक्‍यातील क्रशरचालकांना वीजबिलांवर आधारीत रॉयल्टीसाठी नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहे.

हे ही वाचा : धुराने गुदमरतोय कुकाणेकरांचा श्वास ! घंटागाडी दारोदारी, तरी जळतो कचरा रस्त्यावरी
 
क्रशरचालक संघाचे अध्यक्ष अशोक भगत म्हणाले, महसूल प्रशासनाने प्रथमच वीजबिलावर रॉयल्टी सुरू केली. हे फक्त नगर तालुक्‍यातच सुरू आहे. क्रशरसाठी वीज वापराचे नियम विचारात न घेता, नोटीसा बजावल्या आहेत. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एम. सोरमारे यांना निवेदन दिले आहे. नोटीसा मागे घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत क्रशर सुरू करणार नाही.' उपाध्यक्ष संपत लोटके, सचिव प्रभाकर घोडके, प्रवीण कार्ले, सुरेश वारूळे, सुभाष आढाव, महादेव भगत, विशाल उजागरे, मिनीनाथ दुसुंगे, अजय कराळे आदी उपस्थित होते. याबाबत तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. 
 
मालमत्तेपेक्षा रॉयल्टी जास्त 

नगरमधील क्रशरचालकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले. आता त्यांना काही कोटी रकमेच्या नोटीसा आल्याने मालमत्तेपेक्षा रॉयल्टीच जास्त असल्याने क्रशरचालक धास्तावले आहेत. हे पैसे भरायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT