Revenue Minister Balasaheb Thorat said People are satisfied with our work throughout the year 
अहिल्यानगर

भाजपची लक्षणीय पीछेहाट : थोरात

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल पाहता, जवळपास 80 टक्के जागा महाविकास आघाडीने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल. याचा अर्थ, आमच्या वर्षभरातील कामावर लोक समाधानी आहेत, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता, कोल्हापूर, नंदुरबार, नागपूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वाशीम, बुलडाणा आदींसह 13 जिल्ह्यात कॉंग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. विदर्भात 50 टक्के जागांवर यश मिळाले. मराठवाड्यातही मोठे यश मिळण्याची खात्री आहे.

हे ही वाचा : नगरमध्ये रोहित पवारांची बल्ले बल्ले; विखे, राम शिंदेंना धक्का
 
राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे चार ते साडेचार हजार ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसची सत्ता आली. राज्यात भाजपची पीछेहाट झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खानापूरची व माजी प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावाची जागा राखता आली नाही. भाजपची मंडळी खोटे बोलण्यात पटाईत आहे. हा विजय महाविकास आघाडीच्या कामावर जनता समाधानी असल्याचे प्रतीक आहे, असे थोरात म्हणाले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकारण न आणता, बॅंक चांगल्या पद्धतीने चालवणाऱ्या, शेतकरीहिताचे निर्णय घेणाऱ्या समविचारी लोकांना एकत्र घेऊन निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी लाल रंगात! देशांतर्गत गुंतवणूकदारांचा बाजाराला आधार; Meesho चे शेअर घसरले

माहुली घाटात १५० फूट दरीत कोसळली कार; चालकाचा जागीच मृत्यू, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घटना, कारचा चक्काचूर..

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT