This road in Karjat taluka is dangerous
This road in Karjat taluka is dangerous 
अहमदनगर

video : कर्जत तालुक्यातील हा रस्ता उठलाय जीवावर

नीलेश दिवटे

कर्जत : (जि.अहमदनगर) खेड ते अमरापूर या महामार्गाचे काम चालू अाहे. या रस्त्यावर तालुक्याच्या हद्दीत खेडपासून ते मिरजगाव तिखीपर्यंत अनेक त्रुटी आहेत. त्या मध्ये अनेक ठिकाणी तीव्र वळणे अाहेत. त्या ठिकाणी कुठलेही मार्गदर्शक फलक लावलेले नाहीत. त्या मुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.

पुलाची दिशाच चुकली
याच मार्गावर कर्जत येथून मिरजगावच्या दिशेने बहिरोबावाडी हे गाव आहे.येथे गावाच्या लागत असणाऱ्या नदीवरील पुलाची दिशाच चुकली आहे. कारण या ठिकाणी दोन्ही बाजूंनी ज्या वेळी भरधाव वेगाने वाहने येतात. पूल मात्र, बाजूलाच राहतो आणि अगदी सरळ रेषेत त्या वेळी वाहन नेमके नदीपात्रात पडून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दुतर्फा तीव्र वळण आहेत. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी नवंविवाहित दाम्पत्य, एक मालमोटरचालक यांचा रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन नदीत उलटून अपघातात जागीच ठार झाले होते, असे ग्रामस्थ सांगतात.

या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता.

खेड ते अमरापूर महामार्गाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.मात्र, वाहनचालकांच्या सुरक्षेची कुठलीच काळजी दुर्दैवाने संबंधित काम करणारी यंत्रणा व सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही. या मार्गावर असलेल्या बहिरोबावाडी  गावालगतच्या नदीवरील पूल आणि रस्ता यांची दिशा चुकली अाहे. 

सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदारास पाठीशी घालीत आहे.सदर पूल व रस्ता व्यवस्थित न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- विजय तोरडमल, सरपंच, बहिरोबावाडी-पठारवाडी ग्रुप ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT