Rohit Pawar's path in Karjat-Jamkhed is safe 
अहिल्यानगर

कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचा मार्ग निर्धोक, राम शिंदेंपुढे अग्नीपथ

वसंत सानप

जामखेड : विधानपरिषद निवडणूकीत माजीमंत्री राम शिंदे यांना पक्षाने डावल्याने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्याकडे एकहाती सत्तेला बळकटी मिळाली आहे. पक्षाकडे पद नसल्याने भाजपसमोर कार्यकर्त्यांची फळी टिकून ठेवण्याचे आव्हान आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ तब्बल पंचवीस वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला. मात्र, आमदार रोहित पवारांनी या मतदारसंघाला 'खिंडार' पाडले. 'राष्ट्रवादी' च्या घड्याळाचा दोन्ही तालुक्यात गजर केला. विधानसभेपाठोपाठ पंचायत समितीच्या सभापती निवडीत भाजपला धोबीपछाड देऊन कर्जतची सत्ता  'राष्ट्रवादी' ला मिळविली.

आमदार पवारांनी केवळ मतदारसंघ हेच कार्यक्षेत्र न ठेवता संपूर्ण राज्यात आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. आमदार पवारांच्या राजकारणाची ' झेप ' पहाता त्यांना मतदारसंघात खेळवून ठेवण्यासाठी 'भाजप' खेळी खेळेल आणि त्यांच्यासमोर माजी मंत्री राम शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देईल, असे राजकीय मांडे शिजले जात असतानाच सारे मनसुबे धुळीस मिळाले.

भाजपने शिंदे यांच्या उमेदवारीला अर्धचंद्र दिल्य़ाने अधिच आवसान हरवलेल्या कार्यकर्त्यांचा राहिलेला थोडासा 'धीर'  ही खचला आहे. प्रा. शिंदेही विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मतदारसंघापासून फटकून आहेत. विधान परिषदेची 'आमदारकी' मिळाली की ते मतदारसंघात सक्रीय राहतील, असे कार्यकर्ते खाजगीत बोलत होते. मात्र, त्यांची यावेळी ही संधी हुकली असून पुन्हा नेमकी किती वर्षे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल याचे उत्तर 'काळ'च ठरविल. 'भाजप' ने शिंदेंच्या पुनर्वसनाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पुढील काळात मतदारसंघात 'राष्ट्रवादी' जोमात राहील आणि 'भाजप' मात्र कोमात जाईल,
असे चित्र निर्माण झाल्यास नवल ही वाटायला नको.

आमदार रोहित पवारांचा थेट जनतेशी वाढता संपर्क
आमदार रोहित पवार यांनी निवडणूकीपासूनच थेट जनतेशी संपर्क ठेवला आहे. निवडणुकीनंतर त्यात अधिकची 'भर' पडली आहे. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून त्यांना सुरु केलेला सर्वसमावेशक संपर्क त्यांची व्यक्तीशः ताकद वाढविणारा ठरतो आहे. 'भाजप' चे पारंपरिक मतदार म्हणून ओळखला जाणारा 'माधव' फँक्टरला त्यांनी खिंडार पाडले. लोकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे यापुढे कर्जत-जामखेडमध्ये सर्व सत्तास्थाने आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली  'राष्ट्रवादी'  काबीज करील, अशी पोषक राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT