राहाता ः ‘‘गोदावरी कालव्यांवरील मोडकळीला आलेली ब्रिटिशकालीन बांधकामे हटवून, त्याजागी नवी बांधकामे करण्यासाठी २९ कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. निधीच्या तरतुदीनुसार ही बांधकामे केली जातील. गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निधी मिळावा, यासाठी आपण जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला,’’ अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘उजव्या कालव्यांच्या १२ कामांकरीता १३ कोटी ८१ लाख आणि डाव्या कलव्यांच्या कामासाठी १५ कोटी ३६ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. राहाता तालुक्यातील कामांसाठी सहा कोटी ५६ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकेल.’’ (Rs 29 crore sanctioned for Godavari canals through the efforts of Vikhe Patil)
‘‘माजी खासदार (स्व.) बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रात मंत्री असताना त्यांनी यापूर्वी नाबार्डच्या माध्यमातूनही कालव्यांच्या दुरस्तीकरीता निधी उपलब्ध करुन दिला होता. राज्य सरकारचा निधी उपलब्ध झाल्यास गोदावरीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्वच भागातील कालव्यांची कामे झाल्यास पाण्याच्या वहनातील अडथळे दूर होतील.
कालव्यांच्या कामासाठी निधी उपलब्धतेचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आला होता. राहाता व निफाड तालुक्यांतून जाणाऱ्या उजव्या कालव्यांच्या कामासाठी १३ कोटी ८१ लाख रुपयांच्या निधीतून १२ कामे होतील.’’
राहाता तालुक्यातील कामांकरीता सहा कोटी ५६ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होईल. त्यातून नांदुर्खी, साकुरी, अस्तगाव, गणेशनगर, वाकडी या पाच गावांतून जाणाऱ्या उजव्या कालव्यांची काम तातडीने सुरू करता येतील. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेतच काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
कालव्यांची वहनक्षमता वाढणार
गोदावरी कालव्यांची वहनक्षमता घटल्याने सिंचन घटले आहे. तसेच पाण्याचा अपव्यय वाढला होता. आता या कालव्यांची कामे झाल्यावर या दोन्ही समस्या मार्गी लागतील, असेही आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. (Rs 29 crore sanctioned for Godavari canals through the efforts of Vikhe Patil)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.