Sharad Pawar esakal
अहिल्यानगर

Sakal Survey : ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्याला भगदाड!

आमदार संग्राम जगताप हे अजित पवार यांच्याकडे गेले आहेत. त्यांना शहरात प्रबळ विरोधक नाही.

मुरलीधर कराळे

Sakal Survey - नगर जिल्हा साखरसम्राटांचा. जिल्ह्यातील मातब्बर नेते शरद पवार यांना मानणारे आहेत. मात्र पवार घराण्यातच फूट पडल्याने, आपण कोणाकडे जायचे, हा प्रश्‍न येथील सहा आमदारांना होता. नीलेश लंके, संग्राम जगताप, डॉ. किरण लहामटे आणि आशुतोष काळे हे चौघे अजितदादांच्या गळाला लागले तर रोहित पवार व प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही.

अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी प्रारंभी दादांना पाठिंबा दिला खरा, पण एक-दोन दिवसांतच ते मागे फिरले. जे डॉ. लहामटे आणि सीताराम गायकर हातातहात घालून मधुकर पिचड यांना शह देत होते, ते गायकरही दादांकडे गेले आहेत. आमदार संग्राम जगताप हे अजित पवार यांच्याकडे गेले आहेत. त्यांना शहरात प्रबळ विरोधक नाही.

पवारसाहेबच माझे दैवत आहेत, असे सांगणारे पारनेरचे आमदार नीलेश लंके आणि कोपरगावचे आशुतोष काळे यांनीही अजितदादांना साथ दिली. जो नगर जिल्हा पक्षाचा बालेकिल्ला होता, त्याला भगदाड पडले आहे. उरला प्रश्‍न शंकरराव गडाखांचा. ते अपक्ष आहेत आणि ठाकरे गटाला त्यांची साथ आहे.

संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राहात्यात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील ‘वन मॅन शो’आहेत. पाथर्डीत भाजपच्या मोनिका राजळे यांचे विरोधक प्रतापराव ढाकणे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत, तर माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले आणि चंद्रशेखर घुले यांची भूमिका स्पष्ट नाही. श्रीगोंद्यात माजी आमदार राहुल जगताप शरद पवार यांच्याबरोबर आहेत. तेथे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे. श्रीरामपूरमध्ये आमदार लहू कानडे यांनी मजबूत बांधणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karoline leavitt ट्रम्प यांच्या २८ वर्षीय अधिकारी तरुणीनं ६० वर्षीय व्यक्तीशी का केलं लग्न? स्वत:च केला खुलासा

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

Swarnagiri Temple Tourism: स्वर्गासारखे तेजस्वी ‘स्वर्णगिरी’ मंदिर पाहताक्षणी मन मंत्रमुग्ध होते! जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग

SCROLL FOR NEXT