Rajhans
Rajhans sakal
अहमदनगर

दूध उत्पादकांची दिवाळी होणार गोड; 'राजहंस'कडून मोठ्या घोषणेची शक्यता

आनंद गायकवाड

संगमनेर : कोरोना संकटात खासगी दूध उत्पादकांनी उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मात्र राजहंस दूध संघ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. प्रामाणिक हेतू व निष्ठापूर्वक कामामुळे संगमनेरातील सहकारी संस्था अग्रगण्य असून, राजहंस दूध संघ उत्पादकांची दिवाळी गोड करणार असल्याचे संकेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन व महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते.

ते म्हणाले, थेट गोरगरिबांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या संस्था निष्ठापूर्वक जपल्या पाहीजेत. दूध व्यवसाय तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोरोना संकटात महाविकास आघाडीने घेतलेल्या दहा लाख लिटर दुधाची भुकटी करण्याच्या निर्णयामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. राजहंस दूध संघाने या काळात 1 हजार 800 मेट्रिक टनाची दूध भुकटी बनवली होती. अनियमित दर व नाशवंत पदार्थ असल्याने याबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. दूध उत्पादकांच्या अडचणीच्या काळात संघाने त्यांची पाठराखण केली आहे.

अडचणीमध्ये खासगी संस्था पळ काढीत असल्या तरी सहकारी संस्था साथ देतात. दूध संघाची आर्थिक स्थिती मजबूत असून दीवाळीच्या काळात रिबेट जाहीर केले जाणार असल्याने दूध उत्पादक व कामगारांना दिवाळी गोड होणार आहे. रणजीतसिंह देशमुख म्हणाले, कोरोना संकट संपल्यानंतर खासगी संघाने 1 रुपया दर वाढवून दुधाची पळवापळवी करणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या संस्था शेतकऱ्यांनीच जपल्या पाहीजे. दूध संघाने मुरघासाकरीता 110 मेट्रिक टन आफ्रिकन मकाचे मोफत वाटप केले असून, 95 टक्के कालवडींच्या जन्माची शक्यता असलेले सॉर्टेड सिमेनचा पुरवठा, जनावरांसाठी औषधे व विविध योजना राबवल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, शंकर खेमनर, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, संचालक मोहन करंजकर, सुभाष आहेर, भास्कर सिनारे, विलास वर्पे, माणिक यादव, राजेंद्र चकोर, प्रतिभा जोंधळे, ताराबाई धुळगंड, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT