Sarpanch Saheb was sworn in by helicopter 
अहिल्यानगर

VIDEO नाद खुळा बाकी काय : सरपंचसाहेब हेलिकॉप्टरने शपथविधीला गावी आले, पुऱ्या महाराष्ट्राने नवलं केलं!

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः गावच्या निवडणुकीत कोण काय करील हे सांगता येणार नाही. आता हेच बघा, संगमनेर तालुक्यातील सरपंचसाहेबांनी एकदम झोकात गावात एन्ट्री केली. त्याची चर्चा नुस्ती नगरमध्ये पुऱ्या राज्यात सुरू झालीय. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीही शपथसोहळा करणार नाही, असा समारोह या सरपंचसाहेबांनी केला.

सरपंच झाल्याने ते आणि त्यांचे कुटुंबीय खुश होतेच पण अख्खं आंबी दुमाला गाव या आनंदोत्सवात सहभागी झालं होतं. महिला मंडळींनी फेटे बांधले होते. गावातील पोरंसोरं लेझिम खेळत त्यांचं स्वागत करीत होते.

सगळे आनंदोत्सवात रमले असताना सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. कारण आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते. त्यातून सरपंचसाहेब वुईथ फॅमिली शपथविधी समारंभासाठी आकाशमार्गे अवतरले होते. सगळ्यांनी एकच जल्लोष केला.

गावाने त्यांच्या स्वागतासाठी बारा बैलांची गाडी सजवली होती. त्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढली. त्यानंतर मंत्रीमंडळाचा शपथविधी होतो, तशी या सरपंच महोदयांनी शपथ घेतली. हे  सरपंच म्हणजे जालिंदर गागरे. ते तरूण उद्योजक आहेत. त्यांच्या सरपंच होण्याचा गावालाही मोठा आनंद आहे. कारण ते पदरमोड करून गावासाठी झटत असतात. चांगलं काही होईल, अशी गावकऱ्यांना आशा आहे.

कोण आहे हे सरपंचसाहेब

गागरे यांच्या पुण्यात कंपन्या आहेत. लाखो-करोडोंमध्ये खेळत असले तरी त्यांनी गावची नाळ तुटू दिली नव्हती. त्यामुळेच गावाने त्यांना सरपंचपदाचा मान दिला. आपल्या गावातील, परिसरातील लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांना मान आहे. 

मी गांधींचा मंत्र अवलंबला

महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, असा नारा दिला होता. परंतु अलिकडे खेड्यातून शहराकडे स्थलांतर होत आहे. मीही खेड्यातून शहरात गेलो होतो. परंतु गावचा विकास झाला तर संपूर्ण देशाचा विकास होईल. त्यामुळे मी गावाकडे आलो आहे. यापूर्वीही गावाच्या संपर्कात होतो. आमच्या पॅनलला सर्व नऊ जागा देऊन गावाने आमच्यावरील जबाबदारी वाढवली आहे.

- जालिंदर गागरे, (सरपंच, उद्योजक)

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT