The sarpanch should take measures in the village on the corona 
अहिल्यानगर

गावात सरपंचांनी उपाययोजना कराव्या

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : आरोग्य विभाग व प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नातून कोरोनाला प्रतिबंध घालण्यात यश मिळाले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक सरपंचाने गावपातळीवर उपाययोजना कराव्यात. अडचण आल्यास तातडीने संपर्क साधा, अशी सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केली. 

पंचायत समिती कार्यालयात सरपंचाच्या बैठकीत ते बोलत होते. काळे म्हणाले, की अंगणवाडीसेविका, आशासेविका व मदतनिसांच्या साहाय्याने नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे. एकही नागरिक आरोग्य तपासणीतून सुटता कामा नये. नोकरी-व्यवसायानिमित्त परजिल्हा किंवा परराज्यात असलेल्या येथील नागरिकांना परत आणण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी काळजीपूर्वक करावी. 

\बाहेरगावांतून येथे येणाऱ्या नागरिकांची तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश द्यावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार "कोविड-19 समिती' स्थापन करा. प्रत्येक गावात तरुणांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करा. सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य द्या, असे आवाहन काळे यांनी केले. 

पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सोनाली रोहमारे, पंचायत समिती सदस्य अनसूया होन, अनिल कदम, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे आदी उपस्थित होते. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT